निफाडमधील बंद कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : निफाडतालुक्यातील रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखानाव भाऊसाहेबनगर येथीलनिफाड सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे.
Clear the way to lease closed factories in Niphad
Clear the way to lease closed factories in Niphad

नाशिक : निफाड तालुक्यातील रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना व भाऊसाहेबनगर येथील निफाड सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसमोर अडचणी होत्या; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार बुधवार (ता.९) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

दोन्ही साखर कारखाने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती व स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थांद्वारे कसे भाडेतत्वावर चालविण्यास घेता येतील, याकरिता प्रयत्न सुरू होते. मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून परवानगी घेणे गरजेचे होते.  हा पर्याय संबंधित अधिकाऱ्यांशी  चर्चा केल्यानंतर समोर आला.

या संस्थांना शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून परवानगी देणे आवश्यक असल्याने या दोन्ही संस्थांनी प्रस्ताव शासनाकडे दाखल केले होते. त्याला अनुमती देण्यात आले. रानवड येथील कारखाना शासनाच्या ताब्यात असल्याने तो चालु करण्याच्या निविदा प्रक्रियेत आमच्या संस्था सहभागी होतील. तर निफाड हा दुसऱ्या संस्थेला भाड्याने दिला आहे. त्यासाठी जी मदत लागेल ती, लोकप्रतिनिधी नात्याने करणार आहे. दोन्ही कारखाने लवकर कसे सुरू होतील. 

उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

शेतकरी व कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी सूचना अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा, पणन संचालक सतीश सोनी, सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, साखर विभागाचे उपसचिव संतोष घाडगे, पणन विभागाचे उपसचिव वळवी, सहकार विभागाचे उपसचिव रमेश शिंगटे आदी अधिकारी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com