Agriculture news in marathi Clear the way for Shivneri to get funding | Agrowon

शिवनेरीला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

गणेश कोरे
शनिवार, 9 जानेवारी 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षाच्या शिवजयंतीला जाहीर केलेला २३ कोटींचा निधी अद्याप मिळाला नाही. या विकास निधी बाबत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गुरुवारी (ता.७) आढावा बैठक घेतली. 

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षाच्या शिवजयंतीला जाहीर केलेला २३ कोटींचा निधी अद्याप मिळाला नाही. या विकास निधी बाबत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गुरुवारी (ता.७) आढावा बैठक घेतली. बैठकीमुळे रखडलेला निधी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निधी रखडल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते. 

बैठकीला अप्पर मुख्य सचिव (नियोजन), पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाप्पा बहिर, पुरातत्त्व विभागाचे जुन्नर परिक्षेत्राचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले, जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आदी उपस्थित होते.  

 महाविकास आघाडीचे सरकार स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यादांच १९ फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंतीसाठी शिवनेरीवर आले होते. त्यावेळी त्यांनी किल्ल्याच्या विकासासाठी २३ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. सकाळी शिवजयंतीच्या सोहळ्यात घोषणा आणि संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीत निधीला मान्यता दिली होती. मात्र, यंदाची शिवजयंती जवळ आली तरी मंजूर निधी मिळाला नसल्याने विकासकामे ठप्प आहेत.   

लॉन करणे वन विभागाचे काम नाही
बैठकीत मुख्य सचिव संजयकुमार यांनी विविध विभागांना दर्जेदार कामे करण्याच्या सूचना केल्या. किल्ल्यावर लॉन करणे वन विभागाचे काम नाही. लॉनसाठी खूप पाणी वापरले जाते. कमीत कमी पाण्यावर जगणाऱ्या वृक्षांचे रोपण वन विभागाने करावे. विविध विभागांनी एकाच कामाची पुनर्वृत्ती टाळावी. रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...