Agriculture news in Marathi Clear the way for stagnant micro-irrigation files | Agrowon

रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग मोकळा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले अनेक शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव मार्गी लागणे सुरू झाले आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी नुकतेच सुमारे १९८ प्रकरणे मोकळी करून संबंधित लाभार्थ्यांची यादी अनुदानासाठी सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे.

अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले अनेक शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव मार्गी लागणे सुरू झाले आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी नुकतेच सुमारे १९८ प्रकरणे मोकळी करून संबंधित लाभार्थ्यांची यादी अनुदानासाठी सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात सन २०१७-१८ पासून तर आजवर सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी असंख्य शेतकऱ्यांच्या फायली प्रलंबित पडलेल्या होत्या. विविध कारणांमुळे हे शेतकरी अनुदान मिळण्यापासून वंचित होते. अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे वेळोवेळी तक्रारीही केल्या. परंतु त्यांची प्रकरणे मार्गी लागत नव्हती. सातत्याने शेतकरी कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवत होते.

काही दिवसांपूर्वी पदभार घेतलेले डॉ. खोत यांनी हा विषय गांभिर्याने घेत जुन्या फायली उघडल्या. खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार १९८ प्रकरणांमध्ये सुमारे २० ते २१ लाखांचे अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याबाबत प्रक्रीया करण्याचे यंत्रणांना कळविण्यात आले आहे. अजून काही शेतकऱ्यांच्या फायली शिल्लक आहेत. त्यांना अनुदान मिळाले किंवा नाही, याची चौकशी केल्यानंतर त्यांचीही प्रकरणे मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

विलंबास जबाबदार कोण?
शासनाचे अनुदान असूनही प्रस्ताव मार्गी न लागण्याची कारणे काय आहेत, हा विलंब होण्यास कोण जबाबदार आहे याचा शोध घेण्याची खरेतर आवश्‍यकता आहे. अनुदान तातडीने मिळावे यासाठी शेतकरी सर्व प्रकारची कागदपत्रे वेळेत सादर करतात. स्थानिक पातळीवरील कर्मचारी मोका तपासणी करून त्याचे अहवालही पाठवितात. एवढे सारे होत असतानाही आणि शासनाने अनुदान उपलब्ध असूनही ते पात्र लाभार्थ्यांना न मिळण्यास कोणी आडकाठी आणली होती, याबाबत चौकशीची गरज आहे. सन २०१७-१८ पासून तर गेल्या वर्षांपर्यंत रेंगाळलेली ही प्रकरणे कृषी खात्याच्या कारभाराची गती दर्शविणारी आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने...नगरः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने...
ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा...नाशिक : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण...
माळढोक पक्षी अभयारण्यात आग, २५...सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक...
अकोल्यात ४९७ गावांमध्ये पाणीटंचाईची...अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी...
खंडित केलेल्या कृषिपंपाच्या जोडणीचे काय?नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात...
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याला...मुंबई : अर्थसंकल्प मांडणे आम्हाला नवे नाही. मात्र...
उन्हाळी मूग, उडीद लागवडरब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर सिंचनाखाली...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या...बुलडाणा ः पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
शेतकरी, ग्रामीण भागाचे राज्याच्या...पुणे : राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व...
पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार मानधन द्यानाशिक : पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव...
...त्या तिघींनी पापड उद्योगातून जपली...कोल्हापूर : ‘त्या‘ तिघी एकमेकाला सावरणाऱ्या....
हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते...सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला...
‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन...अकोला : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई...
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने...
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने...नागपूर : यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात...
म्हैसाळ योजनेचे पाणी तिसऱ्या टप्प्यात... सांगली : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू...
कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे ः डॉ....अंबाजोगाई, जि. बीड : नोकरीच्या मागे न लागता...