agriculture news in Marathi Clerk of agriculture University arrested for bribe Maharashtra | Agrowon

लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला पकडले 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर करून, वेळेवर पेन्शन सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे लिपिक रामेश्वर काशिनाथ बाचकर यांनारंगेहाथ पकडले.

नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर करून, वेळेवर पेन्शन सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे लिपिक रामेश्वर काशिनाथ बाचकर (वय ५०, रा. मानोरी) यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर करुन व वेळेवर पेन्शन सुरु करण्यासाठी बाचकर पाच हजाराची लाच मागत होते. त्यामुळे त्रासलेल्या संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने नगर येथील लाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विद्यापीठातील कार्यालयात नगरच्या लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक कारंडे व पोलिस निरीक्षक श्‍याम पवळे यांनी सापळा लावला.

निवृत्त तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी करीत, पंचासमक्ष पाच हजार रुपये स्वीकारताना लिपिक बाचकर यांना विद्यापीठाची सहायक अधीक्षक कार्यालयात पकडले. राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...