agriculture news in Marathi clerk arrested for bribe Maharashtra | Agrowon

शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार मागणारा लिपिक अटकेत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

लाचेची मागणी करणाऱ्या मोहोळ येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला पहिला हप्ता म्हणून चार हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.११) अटक केली. 

सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीची मोजणी करून मोजणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या मोहोळ येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला पहिला हप्ता म्हणून चार हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.११) अटक केली. अकबर हनिफ शेख असे त्या लिपिकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार चंद्रकांत पवार, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद पकाले, श्‍याम सुरवसे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावला. त्यामध्ये तक्रारदाराकडून शेख हा चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. 

तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या नावे मोहोळ तालुक्यात शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने रीतसर भूमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार जमिनीची मोजणी करून दोन्ही गटांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी भूमिअभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिक अकबर हनिफ शेख याने तक्रारदाराकडे केली.

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याशी संपर्क करत याबाबत तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरच्या तक्रारीची पडताळणी केली. तसेच सापळा लावून पहिला हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...