agriculture news in marathi Climate based Fruit Crop Insurance Scheme for Cashews | Agrowon

काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना (अंबिया बहर २०२०-२१)

विनयकुमार आवटे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर,नाशिक जिल्हामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे.  

ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड , ठाणे, पालघर,नाशिक जिल्हामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर  संदर्भ हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. 

या योजनेतंर्गत काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
 

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि प्रमाणके (ट्रिगर) नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रुपये)
अवेळी पाऊस (दि. १ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी  २०२१) 
एका दिवस  ५  मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास   १३,००० रुपये देय
सलग २  दिवस  ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास २६,००० रुपये देय
सलग ३  दिवस  ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास  ४५,५०० रुपये देय
सलग ४  दिवस  ५  मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास   ६५,००० रुपये देय
कमी तापमान (दि. १  डिसेंबर २०२०  ते  २८ फेब्रुवारी  २०२१)
सलग ३  दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास  १४,००० रुपये देय
सलग ४ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास २१,००० रुपये देय
 सलग ५  दिवस १३ अंश  सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास ३५,००० रुपये देय
एकूण विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टरी १,००,००० रुपये
गारपीट (दि. १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१)
३३,३३३ रुपये. यासाठी नुकसान झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनी/ कृषी विभागास कळविणे आवश्यक आहे. या नंतर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर अंतिम करण्यात येते.    

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 
 

हवामान धोके विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रती हेक्टर) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता  (रुपये प्रती हेक्टर)
अवेळी पाऊस, कमी तापमान १,००,००० ५,०००  
गारपीट   ३३,३३३ १,६६७

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
 

कंपनीचे नाव समाविष्ट जिल्हे
बजाज अलायंज जनरल इन्शुरस कंपनी, पुणे रायगड
भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई  पालघर,रत्नागिरी, ठाणे  
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई   सिंधुदुर्ग, नाशिक,कोल्हापूर  

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग

  • योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.
  • पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
  • बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर  विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी , आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा(Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबूकवरील बँक खाते याबाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्विस सेंटर मार्फत ऑनलाइन अर्ज भरता येतील. 
  • एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसुल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
  • एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.
  • शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के  च्या मर्यादेत  राहणार आहे. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. 
  • या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून अदा केली जाते.

योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर, २०२०  

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग संकेत स्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा. 

- (लेखक कृषी विभागात उपायुक्त (कृषी गणना) आहेत)


इतर शासन निर्णय
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
खरिपासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनाहवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
खत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...
डोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...
शाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....
बेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
खाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...
बारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान !मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...
काजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...
मोसंबीसाठी फळपीक विमा योजनामोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर...
गांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍...मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे...
खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण :...राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील...
सेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २०...पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि...
कमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले...
आयात निर्बंधाने उडीद, मूग वधारलेनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१...