हवामान बदलाचा शेतीवर परिणाम : डॉ. जायभाये

नाशिक : सद्यःस्थितीत हवामान बदलाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कधी दुष्काळ, गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस आदींनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
Climate change on agriculture Result: Dr. Jaibhaye
Climate change on agriculture Result: Dr. Jaibhaye

नाशिक : सद्यःस्थितीत हवामान बदलाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कधी दुष्काळ, गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस आदींनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बदलते हवामान, तापमानातील वाढ याचा शेती व सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ  डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी मांडले.

हवामानविषयक जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२३) येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयात ''हवामानातील बदल आणि शेती'' या वर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. 

डॉ. जायभाये म्हणाले, ‘‘हवामान बदलाच्या परिणामाचा प्रभाव कमी करण्यासाठीची हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, शेतीमधून हरितगृह वायू उत्सर्जन कार्बन आणि नायट्रोजनच्या अधिक कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे कमी केले जाऊ शकते. पिकांचे वाण किंवा प्रजाती बदलणे, पीक दिनदर्शिका बदलणे, सूक्ष्म-डोसिंग, मल्चिंग किंवा सेंद्रिय खतांचा वापर यासारख्या पोषक घटकांनी पिकांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.’’ 

‘‘दर्जेदार बियाणे आणि चांगल्या प्रकारे अनुकूलित पिकांची आणि वाणांची लागवड, याबरोबरच एकात्मिक व नियोजित शेती पद्धतीचा अवलंब, पाणी आणि व्यवस्थापन सुधारावे,’’ असा सल्ला डॉ. जायभाये यांनी दिला. 

उपाययोजना आवश्‍यक 

‘‘हवामान बदलाचे शेतीवर होणारे परिणाम हे पिकांच्या वाढीसाठी असुरक्षित आहेत. तापमानात वाढ, हवामानात बदल, पावसाचे स्वरूप बदलल्याने पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत आहे. दुष्काळ, अति उष्णतेच्या लाटा आणि मुसळधार पावसासारख्या अति हवामान घटनेत गेल्या दशकांमध्ये वाढ झाली आहे. जास्त तापमान आणि पर्जन्यमान पिकांचे उत्पादन कमी होत आहे. यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे’’, असे डॉ. जायभाये म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com