Agriculture news in Marathi Climate change hits orchards | Agrowon

वातावरण बदलाचा फळबागांना फटका

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 एप्रिल 2021

गेल्या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यानंतर आता कडक उन्हामुळे पिकांवर संकट उभे राहिले आहे. दिवसाचे उष्णतामान कमालीचे वाढल्याचा परिणाम पिकांवर थेट पडू लागला आहे.

अकोला ः गेल्या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यानंतर आता कडक उन्हामुळे पिकांवर संकट उभे राहिले आहे. दिवसाचे उष्णतामान कमालीचे वाढल्याचा परिणाम पिकांवर थेट पडू लागला आहे.

वातावरण बदलाने शेतकरी सातत्याने संकटांचा सामना करीत आहेत.यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांनाही अवकाळीचा फटका बसला. या दोन्ही हंगामांवर बदललेल्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला. उत्पादन घटले. आताही अवकाळी पावसाने नुकसान केले. त्यापाठोपाठ आता उष्णतामान वाढल्याचा फटका बसत आहे.

जिल्ह्यात संत्रा, केळी बागांना बदलत्या वातावरणाचा ताण सहन होताना दिसत नाही. गेल्या तीन दिवसांतील उष्णतेमुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. त्यातच अनेक ठिकाणी वीज कनेक्शन तोडल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. वातावरण बदलामुळे अकोट तालुक्यात बोर्डी परिसरात केळी बागांमध्ये पाने फाटली असून, काही ठिकाणी जळाल्याचे दिसून येत आहे.

अकोट तालुक्यात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्‍याचा विचार करून संत्रा बागा उभ्या केल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा संत्रा पिकाला फटका बसत आहे. हस्त आणि आंबिया हे दोन्ही बहर अडचणीचे ठरत आहेत. पिकाला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बाधक ठरत आहेत. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- राहुल बोंडे, स्थानिक शेतकरी, उमरा जि. अकोला

हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे संत्रा आंबिया बहराला फटका बसला. हा बहर जवळ जवळ गळाला आहे. त्याचप्रमाणे केळीवर सुद्धा करपा येऊन पाने पिवळी पडत आहेत.
- गजानन धर्मे, शेतकरी, अकोली जहाँगीर, ता. अकोट, जि. अकोला


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...