बदलत्या हवामानाचा गव्हाच्या वाढीवर परिणाम

बदलत्या हवामानाचा गव्हाच्या वाढीवर परिणाम
बदलत्या हवामानाचा गव्हाच्या वाढीवर परिणाम

नाशिक : चालू वर्षी उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाची पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. त्यानंतर जमिनी खाली झाल्यानंतर रब्बीच्या पेरण्या उशिरा झाल्या. मात्र, थंडी कमी असल्याने उशिराच्या गहू पिकांना त्याचा फटका बसला असून काही ठिकाणी वाढ झालेली नाही तर काही ठिकाणी अपेक्षित ओंब्या लगडलेल्या नाहीत. त्यामुळे येवला तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  हिवाळ्यातील थंडी रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र, सुरुवातीपासूनच येवला तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरले आहे. यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू पेरणीत कमालीची वाढ झाली. पाणी टिकून राहील या आशेने मोठ्या प्रमाणावर पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. परंतु, सध्या बदललेले हवामानामुळे गहू पिकांच्या वाढीवर व उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. तालुक्यात चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनवाढीच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, पिकांच्या पोषकतेसाठी महत्त्वाची असणारी थंडी प्रमाण कमी अधिक होत असल्याने पिकांच्या वाढीसाठी अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पिकांची वाढ झाली नाही तर काही ठिकाणी ओंब्या तयार होण्यास अडचणी आल्या आहेत. तालुक्यातील पूर्व भागात सायगाव, पंजारवाडी, न्याहारखेडे आदी गावांमध्ये हे नुकसान दिसून येत आहे. प्रमुख नुकसान

  • थंडी नसल्याने गहू पिकाची अपेक्षित वाढ नाही.
  • काही ठिकाणी वाढ होऊनही ओंब्या लगडल्या नाहीत.
  • मशागत, बियाणे, पेरणी व खते यांसाठी केलेला एकरी दहा हजार खर्च वाया.
  • उत्पादनात घट होऊन जनावरांना चाऱ्यासाठी कोंडा मिळणार नाही.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com