agriculture news in marathi Climate required for optimal growth of various crops | Agrowon

विविध पिकांच्या उत्तमवाढीसाठी आवश्यक हवामान

सौ. दीपाली मुटकुळे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

गहू पिकासाठी थंडी आवश्यक असते. गव्हाच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी १५ अंश सेल्सिअस  तापमान उपयुक्त आहे. जास्त तापमान असल्यास लवकर वाढ आणि फुटव्यांची संख्या कमी राहते.  

गहू पिकासाठी थंडी आवश्यक असते. गव्हाच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी १५ अंश सेल्सिअस  तापमान उपयुक्त आहे. जास्त तापमान असल्यास लवकर वाढ आणि फुटव्यांची संख्या कमी राहते.  

गहू 
गहू पिकासाठी थंडी आवश्यक असते. गव्हाच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी १५ अंश सेल्सिअस  तापमान उपयुक्त आहे. जास्त तापमान असल्यास लवकर वाढ आणि फुटव्यांची संख्या कमी राहते.  उत्पादक फुटवे कमी येतात. वृद्धीचा दर मंद राहून पिकाची उंची कमी राहते. पानांचा घेराही कमी राहिल्याने दाण्याचे वजन कमी राहते. परिणामी, दाण्यांची प्रत निकृष्ट राहते.

या पिकाची पाण्याची आवश्यकता ३५ ते ५५ सेंमी हंगामी आणि वाणानुसार आहे. यासाठी ५० ते ८७.५ सेंमी पावसाची आवश्यकता असते. या पिकास उपयुक्त सरासरी तापमान १५ ते २० अंश  सेल्सिअस लागते. हे पीक किमान तापमान (८-१० अंश  सेल्सिअस) तापमानासही वाढते. मात्र ३० ते ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान गेल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. जास्त तापमान राहिल्यास पीक लवकर परिपक्व होते. उत्पादन कमी येते. या पिकाच्या वाढीसाठी सर्वांत कमी तापमान (त्याला इंग्रजीमध्ये ‘बेस टेंपरेचर’ म्हणतात.) हे ५ अंश सेल्सिअस आहे.

ज्वारी 
उष्ण, कोरड्या आणि प्रखर सूर्यप्रकाशात वातावरणात हे पीक उत्तम येते. या पिकाच्या सुयोग्य वाढीसाठी २४ ते ३०अंश सेल्सिअस तापमान लागते. मात्र, १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानातही हे पीक चांगले येते. या पिकाचे सर्वात कमी तापमान १० अंश सेल्सिअस आहे. बीजांकुरणासाठी ८ ते १० अंश सेल्सिअस तापमान लागते. या पिकास एकूण उष्णतामान १९ अंश सेल्सिअस लागतात. या पिकास लघूप्रकाश दिन लागतात. 

हरभरा 
थंड किंवा मोठ्या प्रमाणावर आर्द्रतायुक्त हवामान या पिकासाठी सर्वोत्तम मानले जाते. हरभरा पिकाचे बीजांकुरण अतिशय विस्तृत तापमानास (१० ते ४५ अंश सेल्सिअस) होते. या पिकाच्या वाढीसाठी सरासरी तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस लागते. मुळांच्या कक्षेतील मातीचे तापमान १५ ते २५ अंश  सेल्सिअस उपयुक्त असते. हे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेल्यास पिकासाठी अपायकारक ठरते. दाणे भरण्याच्या कालावधीत सापेक्ष आर्द्रता २० ते ४० टक्के असल्यास दाणे चांगले भरतात.

सूर्यफूल  
दुष्काळ किंवा शुष्कता प्रतिकारक असे हे पीक आहे. त्याच प्रमाणे उष्ण आणि शीत हवामानासाठीही काटक पीक असून, अति धुक्यासही प्रतिबंधक म्हणून 
ओळखले जाते. दिवसाचे तापमान जास्त असल्यास फुलांमध्ये दाणे कमी भरतात, त्यातील तेलाचे प्रमाण कमी होते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी १८ ते २५ अंश सेल्सिअस तापमान लागते. या पिकास पाण्याची आवश्यकता ३०-३५ सेंमी 
आहे.

करडई 
रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक असलेल्या करडईमध्ये पाण्याचा 
ताण सहन करण्याची क्षमता आहे. परिणामी, हे पीक कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते. या पिकास महाराष्ट्रातील हिवाळ्यातील (रब्बी) थंड व कोरडे हवामान मानवते. जास्त पाऊस किंवा आर्द्रता रोगास आमंत्रण देते.

मेथी 
मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून, कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे. महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. मेथी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानात मेथीचे पीक येत असले, तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होते. पर्यायाने चांगल्या दर्जाची मेथी मिळत नाही.

कांदा
कांदा हे हिवाळी हंगामातील पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची २ ते ३ पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून १ ते २ महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.

गाजर
 गाजर हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान १५ ते २०  अंश सेल्सिअस असावे लागते. १० ते १५ अंश सेल्सिअस तापमानाला तसेच २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाला गाजराचा रंग फिक्कट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळते. गाजराचा आकार आणि रंगही चांगला राहतो. गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांपर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी १८ ते २४ अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक आहे.

जवस 
जवस हे थंड हवामानातील पीक असून, मुख्यत: रब्बी हंगामात घेतले जाते. जवस पिकाच्या वाढीसाठी उष्ण आणि थंड हवामान अनुकूल आहे. जवस पिकासाठी १० ते ३८ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल आहे. उगवण ते वाढीच्या अवस्थेत सरासरी तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस आणि दाणे भरणे अवस्थेत सरासरी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान असल्यास चांगले उत्पादन मिळते.

संपर्कः सौ. दीपाली मुटकुळे, ८९९९०८५०९१.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...