agriculture news in Marathi clogging stock of sugar will presser on next season Maharashtra | Agrowon

आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव 

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जून 2020

कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्याचा बोजा आता येणाऱ्या हंगामावर पडणार आहे. पुढील वर्षाचा(२०२०-२१) साखर हंगाम सुमारे ११५ लाख टन शिल्लक साखरेच्या साठ्यावर सुरु होणार आहे.

कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्याचा बोजा आता येणाऱ्या हंगामावर पडणार आहे. पुढील वर्षाचा(२०२०-२१) साखर हंगाम सुमारे ११५ लाख टन शिल्लक साखरेच्या साठ्यावर सुरु होणार आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात साखरेच्या उत्पादनात वीस टक्‍यांनी जरी घट आली असली तरी ऐन हंगामात साखर विक्री थांबल्याने शिल्लक साखरेचा बोजा येणाऱ्या हंगामावर पडू शकतो, असा अंदाज साखर उद्योगातील सुत्रांचा आहे. शिल्लक साखर व नव्या उत्पादित साखरेच्या विक्रीची कसरत कारखान्यांना यंदाही करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. 

कोरोनाच्या अगोदर साखर उद्योगाने पुढील वर्षी किमान ९० ते १०० लाख टनाच्या आसपास साखर शिल्लक राहील, असा अंदाज केला होता. परंतू साथीने बाजारपेठा बंद राहिल्याने मे चा उत्तरार्ध वगळता मार्च व एप्रिल दोन्ही महिन्यात विक्री मंदावली, याचा परिणाम शिल्लक साखरेच्या वाढीत होणार आहे. सध्या देशांतर्गत साखर विक्रीत थोडी थोडी सुधारणा होत असली तरी अजूनही बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या नाहीत. साखर विक्री मंद पद्धतीने सुरु असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावरही निश्‍चित राहिल असा अंदाज आहे. 

गेल्या तीन महिन्यात कोट्याइतकी साखर कारखान्याकडून विकली जात नसल्याची स्थिती आहे. प्रत्येक कारखाना कोट्याच्या विक्री लक्ष्यांकापेक्षा सरासरी २५ ते ३० टक्‍यांनी मागे आहे. यामुळे इस्माने नुकतीच मे ची साखर विकण्याची परवानगी जूनच्या पूर्वाधामध्ये देण्याची मागणी केली होती. यामुळे सध्य स्थितीत तरी जूनचा कोटाही पुढील महिन्यापर्यंत तसाच रहाणार आहे.

उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे च्या कोट्याची साखर विकली आहे. पण पश्‍चिम आणि दक्षिण भारतातील कारखाने मात्र विक्रीच्या बाबतीत मागे आहेत. सध्या देशात १२५ टन साखर शिल्लक आहे. पुढील हंगाम सुरु होवूपर्यंत आणखी दहा लाख टन साखरेची विक्री होवू शकते. 

पूर्ण लॉकडाऊन निघाल्यासच जूनच्या कोट्याची विक्री 
जूनमध्ये लवकर पाऊस सुरु होणाऱ्या राज्यात साखर विक्री मंदावते. परंतू उशिरा मान्सून सुरु होणाऱ्या राज्यांमध्ये जून अखेर पर्यंत उन्हाळा असल्याने तिथे शीतपेये व अन्य उद्योगांसाठी साखर विक्री वेगात सुरु असते. यंदा मात्र अजूनही पूर्ण लॉकडाऊन मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे मर्यादित स्वरुपातच उद्योगधंदे सुरु आहेत. याचा फटका सध्या त्या भागातील साखर विक्रीलाही बसत आहे. आठ जूननंतर धार्मिक स्थळे व रेस्टॉरंटस मॉल उघडणार असल्याने त्याचा काहीसा सकारात्मक फायदा साखर विक्रीसाठी होवू शकतो 

किमान विक्री मुल्य वाढविण्याच्या हालचाली 
सध्या अन्नमंत्रालयाच्या वतीने साखरेच्या किमान विक्री मुल्यात २०० रुपयांची वाढ करण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा प्रस्ताव मान्य झाल्यास ३१०० रुपयांची विक्री किंमत ३३०० रुपयापर्यंत जाईल याचा फायदा साखर विक्री रखडलेल्या कारखान्यांना होवू शकेल, असा अंदाज साखर तज्ज्ञांचा आहे. जरी साखर शिल्लक राहिली तरी मुल्य वाढणार असल्याने विक्री होणारी साखर तरी काहीशा समाधानकारक दरात विकता येणार असल्याने हा निर्णय साखर उद्योगाच्या दृष्ठीने महत्वाचा ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची थकीत देणीही भागविता येणे शक्‍य असल्याचे कारखानदार सुत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसांत किमान विक्री मुल्य वाढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...