Agriculture news in Marathi Close auction of money laundering traders: Deshmukh | Page 2 ||| Agrowon

पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद करा ः देशमुख

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसतील तर संबंधित आडत व्यापाऱ्यांवर कारवाई करा. त्यांचे लिलाव बंद करा, असे आदेश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.

सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसतील तर संबंधित आडत व्यापाऱ्यांवर कारवाई करा. त्यांचे लिलाव बंद करा, असे आदेश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.  

बाजार समितीच्या सभागृहात सभापती विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. या वेळी उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शेळके, प्रकाश वानकर, अमर पाटील, बसवराज इटकळे, वसंत पाटील, शिवानंद पुजारी, राजकुमार वाघमारे, सचिव चंद्रशेखर बिराजदार, उपसचिव दत्ता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

कांद्याच्या सहा आडत दुकानदारांनी ४० शेतकऱ्यांचे २० लाख रुपये थकवले आहेत. यापैकी ४ लाख दिले असून, अद्याप १६ लाख रुपये थकीत आहेत. काही आडत दुकानदारांनी धनादेश दिले. परंतु ते वटले नाहीत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यावर आमदार देशमुख यांनी प्रशासनालाच थेट सवाल करत शेतकऱ्यांची फसवणूक आडत दुकानदार करीत असतील तर अशांवर कारवाईसाठी कशाची वाट थांबता, त्यांचे लिलाव बंद करा आणि पुढील कायदेशीर कारवाई करा, असे आमदार देशमुख यांनी प्रशासनाला सुनावले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे देता आले नाहीत. पण रब्बी हंगामात खते व बियाणे देण्यात येणार असल्याचे सांगितले.

रस्त्यासाठी दहा कोटी रुपये
बाजार समितीच्या आवारातील भुसार आवार, भाजीपाला आवार व इतर ठिकाणचे रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. येथे सिमेंटचे रस्ते करण्यासाठी आठ कोटी तर डांबरी रस्ते करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव पणन संचालकाकडून मंजूर करून घेण्याचा निर्णय बैठकीत झाला.

५८ विषयांवर चर्चा
शेतकऱ्यांसाठी एक रुपयाच्या जेवणाचे दर वाढवून देणे, डीसीसी बँकेच्या विविध शाखांत बाजार समितीच्या ८.७५ कोटींच्या ठेवी आहेत, त्याची मुदत संपली असून, ती रक्कम पुन्हा पुनर्गुंतवणूक करणे, नवीन परवान्यासाठी आलेल्या अर्जाचा विचार करणे, नवीन दुकान हस्तांतर करणे व मुदत वाढवून मिळणे, बाजार फी, देखरेख खर्च व विलंबाकाराचे आडत्यांनी दिलेले धनादेश बँकेतून वटले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासह वेगवेगळ्या खर्चाला मंजुरी देण्याच्या ५८ विषयांस मंजुरी देण्यात आली.


इतर बातम्या
एकरूख सिंचन योजनेसाठी ५० कोटी रुपये...सोलापूर ः ‘‘अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसाठी...
‘नांदगावात अतिवृष्टीनं सारं नेलं’नाशिक : नांदगाव तालुका अवर्षणप्रवण असल्याने इथली...
नाशिक जिल्ह्यात नऊ केंद्रावर मका,...येवला : हमीभावाने मका,ज्वारी, बाजरी खरेदीसाठी...
प्रशासक मंडळ हटविल्यास दूध संकलन बंद...सोलापूर ः सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून...सिंधुदुर्गनगरी : आंबा, काजू बागायतदारांना...
कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...
परभणीत ‘रोहयो’तून ८८.१५ हेक्टरवर फळबाग...परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय...
परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तुरीचे...परभणी ः जिल्ह्यात यंदा मंगळवार (ता.१४) पर्यंत ९००...
रत्नागिरीत पावसाचा जोर कायम रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे....
सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले सांगली : जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार...
जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकरीच पीकविमा...जळगाव ः दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरअखेर शेतकरी...
पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ...नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे...
वीजबील थकबाकीची वसुली  न झाल्यास राज्य...मुंबई : ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलाची...