Agriculture news in Marathi Closed on Friday against the Agriculture Bill | Agrowon

शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या विधेयकांना कडाडून विरोध करण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारिणीने केला आहे. यासाठी शुक्रवारी २५ सप्टेंबरला देशव्यापी बंद आणि निषेध निदर्शने करण्याची हाक दिली आहे.

पुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या विधेयकांना कडाडून विरोध करण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारिणीने केला आहे. यासाठी शुक्रवारी २५ सप्टेंबरला देशव्यापी बंद आणि निषेध निदर्शने करण्याची हाक दिली आहे.

याबाबत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी व्ही. एम. सिंग, हन्नन मोल्ला, अतुल कुमार अंजान, आशिष मित्तल, पी. कृष्णप्रसाद उपस्थित होते.

समितीतर्फे प्रसिद्धिस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, २८ सप्टेंबर ही शहीद भगतसिंग यांची ११४वी जयंती दिवस केंद्र सरकारची कॉर्पोरेटधार्जिणी, शेतकरीविरोधी तीनही विधेयके, नवीन वीज विधेयक २०२० आणि डिझेल व पेट्रोलची प्रचंड दरवाढ याविरुद्ध जनजागृती व्हावी यासाठी पाळण्याचे ठरवले आहे. या तीनही विधेयकांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल आणि खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल. तसेच सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळत राहील, हे भाजपचे अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांचे आश्वासन धादांत खोटे आहे. कारण केवळ ६ टक्के शेतकरीच या हमीभावाचा लाभ घेतात. त्यामुळे हमीभाव देण्याची काही गरज नाही. एफसीआय आणि नाफेड खरेदी देखील थांबवावी, असे खुद्द भाजप सरकारने नियुक्त शांता कुमार समितीनेच जाहीर केले आहे.

२५ सप्टेंबरला निदर्शने, बंद
सर्व देशप्रेमी शक्तींना या विधेयकाला विरोध करण्याचे आणि ‘कर्जमुक्ती, पूर्ण मोबदला’ या मागण्यांसाठी एआयकेएससीने सुचवलेली दोन्ही विधेयके पास करण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी शुक्रवारी २५ सप्टेंबरला जोरदार संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...
एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...