Agriculture news in marathi closed the gate of Sangli Bazaar Committee for Tolai wages | Agrowon

तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या गेटला टाळे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई मजुरीसाठी समितीच्या मुख्य गेटला आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १७) टाळे ठोकण्यात आले. सुमारे अडीच तासानंतर सभापती दिनकर पाटील बाजार समितीत आले. ११५ व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसीची मुदत पाच दिवसांनंतर संपणार आहे. तोपर्यंत त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्यात आले. 

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई मजुरीसाठी समितीच्या मुख्य गेटला आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १७) टाळे ठोकण्यात आले. सुमारे अडीच तासानंतर सभापती दिनकर पाटील बाजार समितीत आले. ११५ व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसीची मुदत पाच दिवसांनंतर संपणार आहे. तोपर्यंत त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्यात आले. 

शुक्रवारी सकाळी तोलाईदार सभेने बाजार समितीच्या लोखंडी गेटला टाळे ठोकले. समितीच्या कर्मचाऱ्यांना आत जाण्यापासून रोखले. बंदोबस्तासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. ठोस आश्‍वासन मिळाल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेतला. 

दरम्यान, टाळे ठोकल्याची माहिती मिळाल्यानंतर पाटील घटनास्थळी आले. त्यानी तोलाईदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या आश्‍वासनानंतर टाळे काढून धरणे आंदोलन सुरूच ठेवले. हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम, संचालक बाळासाहेब बंडगर, यांच्यासह तोलाईदार उपस्थित होते. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ८२ तोलाईदार कार्यरत आहेत. १६ डिसेंबर २०१४ ला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काट्यावर वजनमापे करताना तोलाई कपात करू नये, असे आदेश पणन संचालकांनी दिले. तोलाईदारांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर २२ डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्स आणि काही व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिथे १६ डिसेंबरचा आदेश राज्यासाठी लागू केला. तोलाईदार सभेने आदेशाविरुद्ध दाद मागितली. तेव्हा शासनाकडे निर्णय सोपवला गेला. 

धरणे आंदोलन सुरूच 

शासनाने एक डिसेंबर २०१८ रोजी १६ डिसेंबरचा आदेश लागू केला. डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण केल्यानंतर १९ सप्टेंबर २०१९ रोजी १६ डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे ३ ऑक्‍टोबरपासून तोलाईदार कामावर जाऊ लागले. परंतु तीन महिने तोलाई माथाडी मंडळाकडे जमा केली नसल्याने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...