पुण्यात ‘जनता कर्फ्यू’मुळे कडकडीत बंद

पुणे ः जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ करण्याच्या आवाहनाला रविवारी (ता. २२) ग्रामीण जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेड्यापाड्यातील नागरिकांनी सकाळपासूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. यामुळे सर्वच भागांत शुकशुकाट होता.
Closed tight due to 'Janata curfew' in Pune

जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, भोर, मुळशी, वेल्हा, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांमधील सर्वच व्यवहार बंद होते. ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आळंदी (ता. खेड)मध्ये ‘जनता कर्फ्यू’ला आळंदीकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. शहरात आज सकाळपासूनच निर्मनुष्य रस्ते आणि बंद दुकानांमुळे शुकशुकाट होता. दुसरीकडे रस्त्यावरील शांततेमुळे आळंदी पालिकेसह मरकळ ग्रामपंयाचतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी करून स्वच्छता मोहीम राबविली.

संकटसमयी बारामतीकर एक असतात, ही एकजूट अत्यंत मजबूतपणे दिसते, याचा प्रत्यय आजही आला. खंबीर व मजबूत बारामतीकरांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 

इतिहासात प्रथमच सर्व बारामतीकर आपापल्या घरात असलेले आढळले. निर्मनुष्य रस्ते व कमालीची शांतता, असे क्षण बारामतीने प्रथमच अनुभवले. बारामती थबकल्याचे अनेक वर्षांनंतर आज पाहायला मिळाले. आज सकाळी सातपासून ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोणीही आज घराबाहेरच पडले नाही. त्यामुळे रस्ते ओस पडलेले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com