बंद असलेली पशुवैद्यकीय रुग्णालये आजपासून सुरु होणार 

चेकनाक्यांवर पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याने जिल्ह्यातील ६३ पशुवैद्यकीय रुग्णालये बंद आहेत.
veternery_20hospital
veternery_20hospital

नगर: चेकनाक्यांवर पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याने जिल्ह्यातील ६३ पशुवैद्यकीय रुग्णालये बंद आहेत. त्याबाबत ‘अॅग्रोवन’ने वृत्त प्रकाशीत करताच पशुसंवर्धन आयुक्तांसह पशुसंवर्धधन अधिकऱ्यांनी तातडीने दखल घेतली. पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चेकनाक्यांवर आता पशुधन विकास अधिकाऱ्यांऐवजी शिपाई संवर्गातील कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच दवाखाने तातडीने सुरु करण्याचे आदेश दिल्याने आजपासून (ता.२९) सर्व दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील कोरोनाच्या चेटपोस्टवर ४४ पशुधन अधिकारी व १९ सहाय्यक पशुधन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील ६३ पशुवैद्यकीय रुग्णालये बंद होती. परिणाणी जनावरांचे आरोग्य उपचाराअभावी धोक्यात आले होते. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्याची एक गाय उपचाराअभावी दगावली. याबाबत ‘अॅग्रोवन’ने सोमवारी (ता. २७) वृत्त प्रकाशीत करताच महानंदाचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्र देऊन लक्ष वेधले. पशुसंवर्धन उपायुक्तांनीही दखल याची घेतली. त्यानंतर सायंकाळी अतिरिक्त पशुसंवर्धन उपायुक्त अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांएवजी शिपाई वर्गातील कर्मचारी नियुक्त केले जाणार असून पशुधन अधिकारी बंद दवाखाने सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यापुर्वी जनावरांना घटसर्प व अन्य लसीकरण करण्यासाठीही अडचण निर्माण झाली होती. ती आता सुटणार आहे असे सांगण्यात आले.  म्हणून मिळाली होती नियुक्ती  नगरसोबत पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्याही अशा नियुक्त्या केल्या आहेत. मात्र चेकनाक्यावर पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती देण्याचे कारणही रंजक आहे. काही दिवसांपुर्वी नगरमधील प्रशासनातील एक प्रमुख अधिकारी पुण्याला जात असताना त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर अडवले. सबंधित अधिकऱ्यांनी आपली ओळख सांगितली मात्र तराही नियमानुसार त्यांची तपासणी केली. त्यामुळे कोरोना संसर्गातील कामात असा प्रमाणिक पणा हवा असे सांगत कोणत्या खात्याचे ही चौकशी केली आणि तशाच नियुक्त्या नगर जिल्ह्यात दिल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com