agriculture news in marathi Closed week market Onion growers hit | Agrowon

बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत बंद आहेत. त्यामुळे कांदा दरावर दबाव वाढला आहे.

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत बंद आहेत. त्यामुळे कांदा दरावर दबाव वाढला आहे. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे चार दिवसांत २०० रुपयांची घसरण झाली आहे. किमान दर ७०० व कमाल दर २७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा सध्या मिळत आहे. 

सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल, एवढा झाला आहे. आगाप लागवडीच्या उन्हाळ कांद्याची आवक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर (ता.साक्री), साक्री, धुळे जळगावमधील जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात  सुरू झाली आहे. सुरवातीला दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. 

गेल्या शनिवारी (ता.२०) लाल कांद्याचे दर जळगाव बाजार समितीत किमान ८०० व कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात गेल्या दोन दिवसांपासून आठवडी बाजार बंद आहेत. तसेच आवकही वाढत आहे. यामुळे कांद्याच्या दरात क्विंटलमागे किमान २०० रुपये घसरण झाली आहे. दरावर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

जळगाव येथील बाजारात गेले चार दिवस प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल आवक झाली आहे. चाळीसगाव येथेही प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. आवक कमी आहे. तरीदेखील दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

लॉकडाउनचा प्रभाव 

खानदेशातून मध्य प्रदेश, गुजरातेतही लाल कांद्याची पाठवणूक केली जाते. परंतु मध्य प्रदेशातही कांद्याची आवक सध्या सुरू आहे. गुजरातेतही कांद्याची लागवड वाढल्याने तेथेही स्थानिक क्षेत्रातून कांदा उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी दरावर दबाव वाढला आहे. स्थानिक बाजारात कोरोना, लॉकडाउनचा प्रभाव दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची स्थिती आहे.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...