Agriculture news in Marathi, The cloud of anxiety is dark due to the delay in the monsoon | Agrowon

पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा मोसमी पावसाच्या आगमनास विलंब झाला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी लांबणीवर पडली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या अधिक बिकट झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर अनेक भागांतील शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे सावट आहे. पावसाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा मोसमी पावसाच्या आगमनास विलंब झाला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी लांबणीवर पडली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या अधिक बिकट झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर अनेक भागांतील शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे सावट आहे. पावसाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

यावर्षी मोसमी पावसाचे आगमन अद्याप झालेले नाही. परंतु, जून महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यामध्ये विविध भागांत पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. रविवार (ता. १६) पर्यंत नांदेड जिल्ह्यात सरासरी ८७.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी ५.८ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी ६७.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी २१.३ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात ८९.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५.६ मिमी पाऊस झाला. काही भागांत झालेल्या जोरदार पूर्वमोसमी पावसानंतर कापूस लागवड केली. परंतु, गेल्या आठवड्यापासून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. परंतु, बहुतांश भागात उघडीप आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नुकसानच अधिक झाले.

गतवर्षी (२०१८) १६ जून पर्यंत या तीन जिल्ह्यात अनुक्रमे १६२.८ मिमी, ११३.५ मिमी, १५६.७ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षी जूनच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाल्याने नांदेड जिल्ह्यात ४८ हजार ९८९ हेक्टरवर, परभणी जिल्ह्यात ३६ हजार १९१ हेक्टरवर, हिंगोली जिल्ह्यात ९० हजारावर हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. 

नांदेड जिल्ह्यातील काही मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन नुकसान झाले होते. यंदा मात्र मोसमी पावसाच्या आगमनासोबत खरिपाच्या पेरण्यादेखील लांबणीवर पडल्या आहेत. जून अखेरपर्यंत चांगला पाऊस पडून पेरण्या पूर्ण झाल्यानंतर ठिक अन्यथा त्यानंतर पेरणी लांबत गेली तर उत्पादनात निश्चितच घट येणार आहे.

गेल्या वर्षीही आमच्या भागात खूप कमी पाऊस झाला होता. जूनअखेरपर्यंत पेरणी केली होती. यंदा पाऊस लांबल्याने एक घागर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. चाऱ्याअभावी जनावरांची विक्री सुरू आहे.
- अरुण जाधव, कुडळी, ता. देगलूर, जि. नांदेड.

औंदा अजून पावसाचा पत्ता नाही. बघाड पडलेली आहे. उन्हाचे चटके सुरू आहेत. पेरणीला खूप उशीर झाला आहे.
- उचितराव पोले, वडहिवरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली.

गतवर्षी ६ ते १८ जून या कालावधीत पेरणी आटोपली होती. यंदा एकच पाऊस झाला. काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. परंतु पेरणी कुठेच झाली नाही. 
बाजीराव शेवाळे, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...