वऱ्हाडावर ढगांचे आच्छादन;  तूर, हरभरा उत्पादकांमध्ये धडकी 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागात बुधवारपासून (ता.१) वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगांचे आच्छादन तयार झाले आहे.
Cloud cover over the bride; Tur, shock to gram growers
Cloud cover over the bride; Tur, shock to gram growers

अकोला ः हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागात बुधवारपासून (ता.१) वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगांचे आच्छादन तयार झाले आहे. सतत ढगाळ वातावरण बनल्याने प्रामुख्याने तूर उत्पादकांमध्ये धडकी भरली आहे. हरभऱ्यावरही अळीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.  या भागात एक ते तीन डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. हा अंदाज खरा ठरत आहे. गेल्या २४ तासांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. अद्याप कुठे पावसाने हजेरी दिल्याचे वृत्त नसले तरी पाऊस कधीही येईल, असे ढग तयार होत आहेत. सध्या तुरीचे पीक वऱ्हाडात बहरावर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीला भरगच्च फुलोर लागलेला आहे. कुठे शेंगाही परिपक्व होत आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळे बुरशी वाढून फुलगळीची शक्यता आहे. शिवाय शेंगामध्ये अळीचेही प्रमाण वाढू शकते. या सर्व बाबी तूर उत्पादनासाठी मारक आहे. आणखी दोन दिवस हे वातावरण राहण्याचा अंदाज असल्याने नुकसानाची पातळी अधिक राहू शकते.  हरभऱ्याच्या पिकालाही या वातावरणाचा अधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. सततचे ढगाळ वातावरण तूर, हरभरा या दोन्ही पिकांसाठी मारक बनलेले आहे. काही शेतकरी तुरीच्या शेंगांवरील अळीच्या नियंत्रणासाठी महागड्या कीडनाशकांचा वापर करीत आहेत. फवारणीचे काम जोमाने होताना दिसत आहे. हरभऱ्याच्या पिकात यंदा मर रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढू लागलेला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com