Agriculture News in Marathi Cloud cover over the bride; Tur, shock to gram growers | Agrowon

वऱ्हाडावर ढगांचे आच्छादन;  तूर, हरभरा उत्पादकांमध्ये धडकी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागात बुधवारपासून (ता.१) वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगांचे आच्छादन तयार झाले आहे.

अकोला ः हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागात बुधवारपासून (ता.१) वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगांचे आच्छादन तयार झाले आहे. सतत ढगाळ वातावरण बनल्याने प्रामुख्याने तूर उत्पादकांमध्ये धडकी भरली आहे. हरभऱ्यावरही अळीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. 

या भागात एक ते तीन डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. हा अंदाज खरा ठरत आहे. गेल्या २४ तासांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. अद्याप कुठे पावसाने हजेरी दिल्याचे वृत्त नसले तरी पाऊस कधीही येईल, असे ढग तयार होत आहेत. सध्या तुरीचे पीक वऱ्हाडात बहरावर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीला भरगच्च फुलोर लागलेला आहे. कुठे शेंगाही परिपक्व होत आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळे बुरशी वाढून फुलगळीची शक्यता आहे. शिवाय शेंगामध्ये अळीचेही प्रमाण वाढू शकते. या सर्व बाबी तूर उत्पादनासाठी मारक आहे. आणखी दोन दिवस हे वातावरण राहण्याचा अंदाज असल्याने नुकसानाची पातळी अधिक राहू शकते. 

हरभऱ्याच्या पिकालाही या वातावरणाचा अधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. सततचे ढगाळ वातावरण तूर, हरभरा या दोन्ही पिकांसाठी मारक बनलेले आहे. काही शेतकरी तुरीच्या शेंगांवरील अळीच्या नियंत्रणासाठी महागड्या कीडनाशकांचा वापर करीत आहेत. फवारणीचे काम जोमाने होताना दिसत आहे. हरभऱ्याच्या पिकात यंदा मर रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढू लागलेला आहे.  


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...