ढगाळ हवामानामुळे पारा घसरला
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला

ढगाळ हवामानामुळे पारा घसरला

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र, यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा झाला.  केरळसह पश्चिम किनारपट्टीवर उद्या(शनिवार)पासून पावसाची शक्यता आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात कमाल तापमानात चढउतार होत असून विदर्भात व मराठवाड्यातील काही भागात उन्हाचा चटका कायम आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअसची उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली.  सोमवारपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून हवामान ढगाळ राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही ऊन सावल्याचा, तर अधूनमधून ढगाळ हवामान राहणार आहे. कोकणातील पारा ३५ अंशांच्या दरम्यान आहे.  मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ४० अंशांच्या दरम्यान होते. मराठवाडा व विदर्भात ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.   बुधवारी रात्रीनंतर अचानक हवामानात बदल होत मध्य महाराष्ट्र, कोकणात व मराठवाड्यातील काही भागांत ढग जमा झाले. पहाटे आंबा आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सकाळी हलका पाऊस पडला. पुणे शहराच्या परिसरात ढगाळ हवामान होते, तर शहराच्या काही उपनगरांत हलका पाऊस पडला. सोलापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपर्यंत हवामान ढगाळ होते. दुपारनंतर ढगाळ हवामानाची तीव्रता कमी होऊन उन्हाची झालर पसरली होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com