आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
ताज्या घडामोडी
ढगाळ हवामानामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त
टीम अॅग्रोवन
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांत वाढत असलेले ऊन व ढगाळ हवामान यामुळे भाजीपाला आणि फलोत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, काढलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्यास ते प्राधान्य देत आहेत.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांत वाढत असलेले ऊन व ढगाळ हवामान यामुळे भाजीपाला आणि फलोत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, काढलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्यास ते प्राधान्य देत आहेत.
सध्या उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग, मका, मूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तसेच आंबादेखील काढणीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्याच्या उत्तर व पूर्व भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दाैंड, इंदापूर, बारामती तालुक्यांत द्राक्षांची काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी डाळिंब पिकाची काढणी सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.
जिल्ह्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. हा चटका दुपारी चार वाजेपर्यंत कायम राहत आहे. त्यानंतर अचानक वातावरणात बदल होत हवामान ढगाळ होत आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना दिलासा मिळत आहे; परंतु शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे.
अनेक ठिकाणी भाजीपाला, कांदा, आंबा यांसारख्या पिकांची काढणी सुरू आहे. अचानक होत असलेल्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात खर्च करून अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक घेतले आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामान होत असल्याने टोमॅटो उत्पादकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत शेतकरी रघुनाथ शिंदे म्हणाले, की आम्ही नुकतीच टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. शनिवारपासून होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये पावसाची चिंता लागून आहे. ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग- किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी पिकांची काळजी घेत आहेत.
इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...
साडेसात हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण...नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘ई-फेरफार प्रणालीत नाशिक विभागाची बाजी’नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत...
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या समक्षच...भंडारा : जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी...
अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ....अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच...कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने...
काजू खरेदी करताना आडकाठी केल्यास पोलिस...सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार...
‘म्हैसाळ’चे पाणी बंदिस्त पाइपद्वारे...सांगली ः जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या...
कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा...उत्तूर, जि. कोल्हापूर : आधी पुनर्वसन मग धरण हा...
‘शेतकरी सन्मान’च्या कामांना आता...औरंगाबाद : येत्या ८ मार्चपासून पंतप्रधान शेतकरी...
मार्च महिन्याची सुरुवातच अकोलेकरांसाठी...अकोला : मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा...
पंतप्रधानांची शेतकऱ्यांसाठी ‘बुक...नाशिक : देशात मागील काही महिन्यांपासून कृषी...
योजनेत गोंधळ झाल्यास ‘महसूल’ जबाबदार...पुणे : ‘‘कृषी खात्यात आम्ही राबतो व श्रेय महसूल...
ताकारी उपसा सिंचन योजनेचे फक्त आठच पंप...सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन १२...
वाशीममध्ये उन्हाळी पिकांच्या लागवडीकडे...वाशीमः या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने...
- 1 of 1061
- ››