Agriculture news in marathi Cloudy weather hit the mangoes gardens in Sindhudurga | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा आंबा बागांना फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होणार आहे. या वातावरणामुळे दोन्ही पिकांवर बुरशी आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव होईल. त्यामुळे कृषी विभागामार्फत सध्या जिल्हाभर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. त्यात दोन्ही पिकांची कशा प्रकारे काळजी घ्यावी, यासंदर्भात मार्गदर्शन सुरू आहे. 
- सी. डी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग.

आंब्याला मोहर येण्यासाठी आवश्‍यक थंडी अद्याप नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही आंब्याला मोहर नाही. आता काही झाडांना पालवी येत आहे. त्यातच आता गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण आहे. त्याचा मोठा परिणाम आंबा बागांना होणार आहे. या वर्षीचा आंबा हंगाम अडचणीत आहे.
- माधव साटम, आंबा उत्पादक शेतकरी, शिरगाव, ता. देवगड.

आंबा हंगाम आता लांबणीवर पडणार हे निश्‍चित आहे. लांबलेल्या पावसाचा हा परिणाम आहे. थंडीचा पत्ता नाही. यानंतर मोहरलेला आंबा मे महिन्याच्या मध्यानंतर तयार होईल. त्या  वेळी कदाचित जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला असेल. त्यामुळे आंब्याला दरही मिळणार नाही. वातावरणाच्या बदलाची मोठी किंमत बागायतदारांना मोजावी लागेल. 
- संजय नाईक, आंबा उत्पादक शेतकरी, वेतोरे, ता. वेंगुर्ला.

सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच अजूनही आंब्यांना मोहर नसल्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपूर्वी अचानक बदल झाला. जिल्ह्यात गेले पाच दिवस ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या सरी आणि जोरदार वारे अशी स्थिती आहे. बदललेल्या या वातावरणाचा मोठा फटका आंबा बागांना बसला आहे. अगोदरच क्यार वादळामुळे पडलेल्या पावसामुळे बागांचे मोठे नुकसान झाले. 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी सुरू होते. तशा स्वरूपाची थंडी अद्याप सुरू झालेली नाही. त्यातूनही विविध प्रयोग करीत बागायतदार आंबा पीक मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना दिसत होते. आंब्याला आता पालवी फुटली होती. परंतु, गेल्या पाच दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे पुन्हा कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंब्याच्या पालवीवर बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या भागात वाऱ्यांचा वेग अधिक आहे. तेथे काही अंशी कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप आंब्याला मोहर आलेला नाही. दरवर्षी काही बागांमधून डिसेंबर, जानेवारी महिन्यात आंब्याच्या पेट्या बाजारपेठांमध्ये रवाना होतात. परंतु, या वर्षी अजूनही मोहर नसल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. एकीकडे बागायतदार नैसर्गिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे आफ्रिकन आंबा बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. हापूसचा हंगाम जरी सुरू होण्यास विलंब असला, तरी या आंब्याचे आव्हानदेखील येथील आंबा बागायतदारांसमोर असेल. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद ‘केव्हीके’चे शेतकरी जोडो अभियानऔरंगाबाद : शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती...
वऱ्हाडात यंदा पांढरे सोने ठरले...अकोला ः यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक...
चक्रिवादळाचा थंडीवर परिणामकोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे...
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला...गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह...
वीजबिलांचा विषय मंत्रिमंडळाने सोडलेला...मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे...
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला...नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न...
आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखलचंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी...
महाराष्ट्राचा विकास हेच समान सूत्र : ...मुंबई ः ‘‘मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील...
मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच...भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी,...
निर्यातवृद्धीसाठी पायाभूत सुविधा...रत्नागिरी  : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
भाताला प्रति क्विंटलला ७०० रुपये बोनस सिंधुदुर्ग : शासनाने भाताला प्रतिक्विंटलला...
लाळ्या खुरकूतच्या लसींची गरजसांगली :  जिल्ह्यात सुमारे १३ लाख १६...
साताऱ्यात अकरा लाख टन ऊसाचे गाळप सातारा : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली...
पदवीधरची निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने...औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक...
केकत जळगावात बिबट्याची दहशतऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील केकत जळगावात...
किनवटमध्ये किसान सभेचा रास्ता रोको नांदेड : कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच...
खानदेशात ‘रब्बी’तील पीक कर्जवाटप सुरूजळगाव : खानदेशात खरिपातील पीक कर्ज वितरण ६०...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या...नांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी धडपड नाशिक : बियाण्यांची टंचाई, तसेच अतिवृष्टीमुळे...