agriculture news in Marathi cloudy weather in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात ढगाळ वातावरण 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर झाला आहे. 

पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडी कमी राहिल. मंगळवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात येथे १२.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत हवामान निरभ्र झाले आहे. मात्र, उत्तर केरळ आणि अरबी समुद्राच्या काही भागांत अजूनही चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर उत्तर केरळात ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. एक ते दोन दिवसांत ही स्थिती निवळून राज्यात पुन्हा काही प्रमाणात थंडी परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्यावर गेले आहे. 

सध्या कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागात थंडी चांगलीच कमी झाली असून किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी आहे. पुणे, नगर, नाशिक, जळगाव या भागांत थंडीचा प्रभाव कायम आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली भागात थंडी कमी असल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. 

मध्य महाराष्ट्रात १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात जवळपास सर्वच भागात थंडी कायम आहे. त्यामुळे भागात १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. 

सोमवारी (ता.२२) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रुझ) २१.४ (३) 
 • ठाणे २१.२ 
 • अलिबाग २३.० (४) 
 • रत्नागिरी २२.४ (३) 
 • डहाणू २२.० (३) 
 • पुणे १५.२ (३) 
 • नगर १५.३ 
 • जळगाव १२.७ (-१) 
 • कोल्हापूर २०.९ (४) 
 • महाबळेश्वर १५.९ (१) 
 • मालेगाव १८.२ (६) 
 • नाशिक १४.६ (२) 
 • निफाड १२.४ 
 • सांगली १८.९ (३) 
 • सातारा १६.२ (२) 
 • सोलापूर १९.० (१) 
 • औरंगाबाद १६.२ (२) 
 • बीड १६.५ (२) 
 • परभणी १५.४ (-१) 
 • परभणी कृषी विद्यापीठ १२.१ 
 • नांदेड १४.५ 
 • उस्मानाबाद १६.१ (-१) 
 • अकोला १५.८ (-१) 
 • अमरावती १८.० 
 • बुलडाणा १२.४ (-५) 
 • चंद्रपूर १४.६ (-३) 
 • गोंदिया १२.६ (-४) 
 • नागपूर १४.९ (-१) 
 • वर्धा १५.२ (-१) 
 • यवतमाळ १७.० (-१) 

इतर अॅग्रो विशेष
शेतीमध्येही रंगवितो प्रयोगशीलतेचे धडेपरभणी येथील गांधी विद्यालयामध्ये कला शिक्षक...
विदर्भात तापमान चाळिशीपार पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ...
पीकविम्यासाठी राज्य नवीन धोरण आणणार :...मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या...
अर्थव्यस्थेच्या घसरणीला ‘कृषी’चा टेकूपुणे ः कोरोना विषाणूच्या विळख्याने देशासह...
उशिराचे शहाणपणमुं बई बाजार समितीने शेतीमालाचे संपूर्ण व्यवहार...
नारायणगाव येथे होणार टोमॅटो प्रक्रिया...पुणे : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील...
सेंद्रिय शेतीमालाबाबत सर्वंकष धोरण...सोलापूर ः शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे...
बारामती कृषी महाविद्यालयाला ‘आयसीएआर’ची...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेने आता देशातील...
धान्यासहित कडब्यासाठी दादर ज्वारी आश्‍...कमी पाणी व अल्प खर्चात सकस धान्य, पशुधनासाठी...
चिकाटीतून नावारूपाला आणला गूळ उद्योगहिंगोली जिल्ह्यातील देवजणा येथील कैलासराव...
शंभर दिवसांनंतरही कृषी कायद्यांना विरोध...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी...
हळद पिवळे करून जातेयचार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’,...
राज्यात ३४ लाख घरांना मिळाला नळलातूर ः केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनची राज्यात...
दोन नव्या फुलपाखरांना नागपुरात मिळाला...नागपूर ः पर्यावरण संरक्षणासोबतच पीक परागीकरणात...
द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना ...नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे आणि कसबे...
प्रयोगशील शेतकऱ्यांचा शासनाला पडला विसर...नागपूर ः प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
आम्ही शेतकरी कंपनीकडून शेतकऱ्यांना...परभणी ः मांडाखळी (ता. परभणी) येथील आम्ही शेतकरी...
निधीवाटपात कोणावरही अन्याय होणार नाही ः...मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी...
उन्हाचा पारा वाढू लागला पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या झळा वाढू...