कोकणात ढगाळ वातावरण 

कोकणातील बहुतांशी भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. आज (ता.२७) कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
Hawaman
Hawaman

पुणे : कोकणातील बहुतांशी भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. आज (ता.२७) कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार असून उन्हाचा चटका काहीसा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात असलेली चक्रिय वाऱ्याची स्थिती निवळली आहे. या भागात उन्हाची तीव्रता पुन्हा काहीशी वाढू लागली आहे. यामुळे कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील जवळपास सर्वच भागातील ढगाळ वातावरणाची स्थिती निवळून आकाश निरभ्र राहील. त्यामुळे कमाल तापमानात आणखी वाढ होईल. शुक्रवारी (ता.२६) सकाळी चोवीस तासात चंद्रपूर येथे ४०.६ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंदवले गेले. 

उन्हाचा चटका वाढत असल्याने अवकाळी पावसामुळे हवेत तयार झालेला गारवा कमी होऊ लागला आहे. कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या भागात कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात कमीअधिक स्वरूपात कमाल तापमान आहे. या भागात २९ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. मराठवाड्यात निरभ्र वातावरण झाल्याने ३५ ते ३७ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. 

शुक्रवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३८.७ 
  • रत्नागिरी ३७.३ 
  • डहाणू ३७.८ 
  • पुणे ३७.१ 
  • जळगाव ३८.२ 
  • कोल्हापूर ३६.६ 
  • महाबळेश्वर २९.१ 
  • मालेगाव ३६.८ 
  • नाशिक ३६.४ 
  • सांगली ३७.७ 
  • सातारा ३६.१ 
  • सोलापूर ३९.१ 
  • औरंगाबाद ३६.८ 
  • उस्मानाबाद ३५.६ 
  • परभणी ३७.८ 
  • नांदेड ३७.५ 
  • अकोला ३९.० 
  • अमरावती ३८.० 
  • बुलडाणा ३६.५ 
  • ब्रम्हपुरी ३९.५ 
  • चंद्रपूर ४०.६ 
  • गोंदिया ३७.० 
  • नागपूर ३७.० 
  • वर्धा ३७.४   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com