agriculture news in Marathi cloudy weather possibility Maharashtra | Page 2 ||| Agrowon

ढगाळ हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कोकण, दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात आहे. मात्र, मुंबईजवळ असलेले चक्रावाताची स्थिती निवळत असल्याने ढगाळ वातावरणाची तीव्रता कमी होत आहे. या भागात आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) या भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे. रविवारपासून (ता. ८) पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

पुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कोकण, दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात आहे. मात्र, मुंबईजवळ असलेले चक्रावाताची स्थिती निवळत असल्याने ढगाळ वातावरणाची तीव्रता कमी होत आहे. या भागात आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) या भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे. रविवारपासून (ता. ८) पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

 अरबी समुद्राच्या वायव्येस पवन चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. पुढील दोन ते चार दिवस त्याची तीव्रता राहणार आहे. हे चक्रीवादळ येमेनमधील सोकोट्रापासून आग्नेयेच्या दिशेला सुमारे ४७० किलोमीटर, तर सोमालियातील बोसासोपासून ८२० किलोमीटर अंतरावर आहे. तर दुसऱ्या चक्रावाताची स्थिती ही मुंबईपासून नैर्ऋत्याकडे ७१० किलोमीटर तर गोव्याच्या पश्चिमेस ६८० किलोमीटर अंतरावर आहे. आज या चक्रावाताची स्थिती निवळण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान काही प्रमाणात कोरडे राहील.

त्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे.  
ढगाळ हवामानामुळे मुंबई, पालघर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे भात उत्पादकांची काही प्रमाणात धावपळ झाली. मात्र, यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून कोकणातील किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

मध्य महाराष्ट्रातही हवामान अंशतः ढगाळ असून, किमान तापमान १५ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. महाबळेश्वर येथे १५.२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भाच्या अनेक भागात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी होती. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत गोंदिया येथे १२.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये १३.७ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.

तर चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा या भागांतही १६ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानाचा प्रभाव कमी अधिक आहे. त्यामुळे थंडी कमी असून, किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. उस्मानाबाद, परभणी या भागात किंचित थंडी असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  


इतर अॅग्रो विशेष
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...