agriculture news in marathi, cloudy weather in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामान
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला मध्यम ते जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मुख्यत: उघडीप दिल्याचे दिसून आले. इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील पावसाचा एखाद-दुसरा अपवाद वगळता जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान होते. दिवसभर उकाडाही वाढला होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली असून, धरणांमधील पाण्याचा साठा कमी होण्यास सुरवात झाली आहे.

पुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला मध्यम ते जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मुख्यत: उघडीप दिल्याचे दिसून आले. इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील पावसाचा एखाद-दुसरा अपवाद वगळता जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान होते. दिवसभर उकाडाही वाढला होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली असून, धरणांमधील पाण्याचा साठा कमी होण्यास सुरवात झाली आहे.

पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत होत्या. बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. २१) सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. पाऊस पडेल असे वाटत असतानाच प्रत्यक्षात उघडीप होती. इंदापूर तालुक्यातील सणसर आणि पुरंदर तालुक्यातील जेजुरी, राजेवाडी, कुंभारवळण येथे पावसाने हजेरी लावली. जेजुरीत पावसाचा जोर अधिक होता. येथे २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सह्याद्री पर्वताच्या उतारावर असलेल्या तालुक्यांमध्ये जोरदार बरसात झाल्याने जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधील पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली आहे. कळमोडी, भामाअसखेड, आंद्रा, वरसगाव, भाटघर, निरा देवघर धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्यासाठी कालव्यातून आवर्तनेही सुरू करण्यात येत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...