शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
अॅग्रो विशेष
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण
मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या ईशान्य भाग आणि सौराष्ट्र परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे.
पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या ईशान्य भाग आणि सौराष्ट्र परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे. विदर्भाच्या काही भागात चांगलीच थंडी आहे. रविवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात हवामान कोरडे झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र हा पारा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी-अधिक स्वरूपात असून, किमान तापमानातही चढउतार असल्याची स्थिती आहे. दरम्यान, अरबी समुद्राच्या दक्षिण भाग आणि हिंदी महासागर परिसरात चक्रीय वाऱ्यांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे व परिसर व आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि यानाम, रायलसिमा, कर्नाटकाचा दक्षिण भारतात मंगळवारी (ता. १९) पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडी काहीशी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. तर राज्यात ११ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदविले गेले आहे. विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागात थंडी आहे. यामुळे किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
रविवारी (ता. १७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) १८.२ (१)
- अलिबाग १८.३ (१)
- रत्नागिरी १९.८ (१)
- डहाणू १७.२ (२)
- पुणे १६.७ (६)
- जळगाव १८.५ (७)
- कोल्हापूर २०.८ (५)
- महाबळेश्वर १६.६ (३)
- मालेगाव १८.६ (८)
- नाशिक १६.४ (६)
- सांगली २०.१ (६)
- सातारा १८ (५)
- सोलापूर १९.१ (३)
- औरंगाबाद १७.९ (६)
- बीड १९.६ (६)
- परभणी १८.१ (४)
- नांदेड १८.१ (४)
- उस्मानाबाद १६ (१)
- अकोला १७.९ (३)
- अमरावती १७.१ (२)
- बुलडाणा १९.४ (६)
- गोंदिया ११.५ (-२)
- यवतमाळ १८ (३)
- 1 of 670
- ››