ढगाळ हवामानाने वाढविली द्राक्ष उत्पादकांची धाकधुक

Cloudy weather threatens grape growers
Cloudy weather threatens grape growers

सांगली ः जिल्ह्यात रात्रभर पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या द्राक्ष फळछाटणीला फटका बसला असून, फुलकुज आणि फळगळ तसेच डाऊनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आगाप हंगामातील द्राक्षे परिपक्व होऊ लागली असून मनी तडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. 

जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी थांबून थांबून हलका पाऊस पडत होता. या वर्षी द्राक्ष शेतकऱ्यांमागील खराब हवामानाचे शुक्‍लकाष्ठ थांबण्यास तयार नाही. अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडल्या पडल्या आता ढगाळ वातावरणाने द्राक्ष पीक संकटात आले आहे. आगाप छाटणी केलेल्या बागांचे मनी परिपक्व होऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला, तर काही ठिकाणी रात्रभर पाऊस होता. त्यामुळे परिपक्व झालेले मणी तडकण्याची शक्यता आहे. 

ऑक्टोबर महिन्यात १८ ते २५ या दरम्यान शेतकऱ्यांनी फळछाटणी घेतली आहे. सध्या या बागा फुलोरावस्थेत आहेत. थंड वारे ढगाळ वातावरण शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यात द्राक्षपट्ट्यात ठिकाणी हलक्‍या पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे वातावरण आणखी थंड झाले आहे. यापूर्वी दावण्या आटोक्‍यात आलेल्या बागांना या हवामानाचा मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार सध्या मुक्कामाला बागेत आणि पाठीवर कीटकनाशकाचा पंप असे चित्र ग्रामीण भागात सर्वत्र दिसत आहे. आधीच औषधे फवारून मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता आणखी कीटकनाशकांवर खर्च करावा लागणार आहे. फवारणी पंपाचे आवाज सर्वत्र घुमत आहेत.

या वर्षी द्राक्षबागेला पोषक असे वातावरण पहिल्यापासून मिळाले नाही. सुरवातीच्या काळात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले, त्यातून बागा जगवल्या. त्यात आता पुन्हा वातावरण बदलले आहे. त्यामुळे आगाप आणि उशिरा घेतलेल्या बागांना दुहेरी फटका बसणार आहे. - महादेव लाड, कुंडल, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com