Agriculture news in Marathi Cloudy weather threatens grape growers | Agrowon

ढगाळ हवामानाने वाढविली द्राक्ष उत्पादकांची धाकधुक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सांगली ः जिल्ह्यात रात्रभर पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या द्राक्ष फळछाटणीला फटका बसला असून, फुलकुज आणि फळगळ तसेच डाऊनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आगाप हंगामातील द्राक्षे परिपक्व होऊ लागली असून मनी तडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. 

सांगली ः जिल्ह्यात रात्रभर पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या द्राक्ष फळछाटणीला फटका बसला असून, फुलकुज आणि फळगळ तसेच डाऊनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आगाप हंगामातील द्राक्षे परिपक्व होऊ लागली असून मनी तडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. 

जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी थांबून थांबून हलका पाऊस पडत होता. या वर्षी द्राक्ष शेतकऱ्यांमागील खराब हवामानाचे शुक्‍लकाष्ठ थांबण्यास तयार नाही. अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडल्या पडल्या आता ढगाळ वातावरणाने द्राक्ष पीक संकटात आले आहे. आगाप छाटणी केलेल्या बागांचे मनी परिपक्व होऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला, तर काही ठिकाणी रात्रभर पाऊस होता. त्यामुळे परिपक्व झालेले मणी तडकण्याची शक्यता आहे. 

ऑक्टोबर महिन्यात १८ ते २५ या दरम्यान शेतकऱ्यांनी फळछाटणी घेतली आहे. सध्या या बागा फुलोरावस्थेत आहेत. थंड वारे ढगाळ वातावरण शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यात द्राक्षपट्ट्यात ठिकाणी हलक्‍या पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे वातावरण आणखी थंड झाले आहे. यापूर्वी दावण्या आटोक्‍यात आलेल्या बागांना या हवामानाचा मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार सध्या मुक्कामाला बागेत आणि पाठीवर कीटकनाशकाचा पंप असे चित्र ग्रामीण भागात सर्वत्र दिसत आहे. आधीच औषधे फवारून मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता आणखी कीटकनाशकांवर खर्च करावा लागणार आहे. फवारणी पंपाचे आवाज सर्वत्र घुमत आहेत.

या वर्षी द्राक्षबागेला पोषक असे वातावरण पहिल्यापासून मिळाले नाही. सुरवातीच्या काळात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले, त्यातून बागा जगवल्या. त्यात आता पुन्हा वातावरण बदलले आहे. त्यामुळे आगाप आणि उशिरा घेतलेल्या बागांना दुहेरी फटका बसणार आहे.
- महादेव लाड, कुंडल, जि. सांगली


इतर बातम्या
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...