agriculture news in Marathi cloudy weather in west Maharashtra | Agrowon

पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण 

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी अंशतः ढगाळ वातावरण आहे.

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. मराठवाडा व विदर्भात काहीसा उन्हाचा चटका असल्याने शनिवारी (ता. १५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी आहे. 

पुढील काही दिवसांत मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात चांगलेच बदल होत आहेत. तर विदर्भ व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ढगाळ वातावरणामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. सोलापूर, नगर या भागांत पाऊस झाल्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला आहे. 

कोकणातही तुरळक ठिकाणी सरी बरसल्याने उकाडा कमी झाला आहे. कोकणात कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर मध्य महाराष्ट्रातही कमीअधिक स्वरूपात कमाल तापमान असल्याने जळगाव, मालेगाव भागात पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर होता. इतर भागांत पारा ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होता. मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या झळा काही प्रमाणात तीव्र होत्या. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
रविवार :
संपूर्ण महाराष्ट्र 
सोमवार ः पालघर, भंडारा, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ 
मंगळवार ः अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, उर्वरित भागांत ढगाळ वातावरण 
बुधवार ः मुंबई, नगर, औरंगाबाद, जालना जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरण 

शनिवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३४.५ 
 • अलिबाग ३२.५ 
 • रत्नागिरी ३६.१ 
 • डहाणू ३४.६ 
 • पुणे ३७.८ 
 • जळगाव ४१.५ 
 • कोल्हापूर ३५.७ 
 • महाबळेश्‍वर ३०.६ 
 • मालेगाव ४२ 
 • नाशिक ३८.७ 
 • सांगली ३७.१ 
 • सातारा ३७.१ 
 • सोलापूर ३९.४ 
 • औरंगाबाद ३९.४ 
 • परभणी ४१.६ 
 • नांदेड ४१.५ 
 • अकोला ४३ 
 • अमरावती ४१.८ 
 • बुलडाणा ४०.६ 
 • चंद्रपूर ४१.४ 
 • गोंदिया ४१.५ 
 • नागपूर ४०.८ 
 • वर्धा ४२.६ 

इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...