agriculture news in marathi, cludy climate in dhule, maharashtra | Agrowon

धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ढगाळ हवामान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018
धुळे  ः जिल्ह्यासह नंदुरबार भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, उष्णता वाढली आहे. याचा परिणाम शिरपूर (जि. धुळे) व शहादा (जि. नंदुरबार) भागातील पपई, केळी पिकावर होत आहे. जळगाव जिल्ह्यातही विषम वातावरण असून, केळी पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. केळीची वाढ हवी तशी नाही. तसेच घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे.
 
धुळे  ः जिल्ह्यासह नंदुरबार भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, उष्णता वाढली आहे. याचा परिणाम शिरपूर (जि. धुळे) व शहादा (जि. नंदुरबार) भागातील पपई, केळी पिकावर होत आहे. जळगाव जिल्ह्यातही विषम वातावरण असून, केळी पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. केळीची वाढ हवी तशी नाही. तसेच घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे.
 
मध्यंतरी सुसाट वाऱ्याने कापणीवरील पिकांमध्ये झाडांची पडझड झाली. पाऊस व गारपिटीच्या भीतीने कापणीवरील बागांमधून घड काढून व्यापाऱ्यांना त्यांची विक्री सुरू आहे. सध्या आगाप बागा व पिलबागांमध्ये यावल, रावेर येथे कापणी सुरू झाली आहे. एक ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये झाडांची वाढ खुंटली असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
नंदुरबार, शहादा, शिरपूर भागांत पपईच्या बागांमध्ये फळे पक्व होण्याच्या प्रक्रियेवर उष्ण व ढगाळ हवामानामुळे परिणाम झाला असून, लहान, कच्ची फळे शेतकरी व्यापाऱ्यांना दोन रुपये प्रतिकिलो दरात विक्री करीत आहेत. दर्जेदार फळे निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी बागा मोडल्या असून, क्षेत्र रिकामे केले आहे.
 
शहादा तालुक्‍यातील ब्राह्मणपुरी, जवखेडा व परिसरात केळीच्या बागांचे काटेकोर व्यवस्थापन शेतकरी उष्णतेपासून बचावासाठी करू लागले असून, बागोभोवती हिरवी नेट, कडबा वारा अवरोधक म्हणून वापरला जात आहे. उंच वाढणारे गवतही शेतकऱ्यांनी मागील महिन्यातच बागेभोवती पश्‍चिम व दक्षिण दिशेला लावल्याची माहिती मिळाली. उष्णतेमुळे कांदा, उशिरा लागवड केलेला मका व केळी या पिकांच्या सिंचनाचा कालावधी बदलला असून, अधिक वेळ सिंचनही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...