कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद

कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

नागपूर : नागपूर विभागात पाटणसावंगी (जि. नागपूर), कांढळी (जि. वर्धा) व मूल (जि. चंद्रपूर) या तीन ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी (ता.१९) संवाद साधला. प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनानंतर उत्साह संचारला. प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या एकूणच विचारप्रक्रियेवर क्रांतिकारी सकारात्मक बदल करणारे ठरेल, अशी भावना या संवादानंतर अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

शेतीशी उद्योजकतेचा संबंध जोडण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे. या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान व ज्ञानाचे आदानप्रदान होईल व एकत्रितपणे शेती समस्यांशी सामना करता येईल. - सुनील कोपरकर, शेतकरी, परसोडी (जि. वर्धा)

प्रशिक्षण कार्यक्रमातून गटशेतीबद्दल मोलाची माहिती मिळाली. प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व कळले आहे. गावातील शेतकऱ्यांना गटशेतीसाठी प्रवृत्त करू. - ललिता वहाणे, सरपंच, भेंडाळा (जि. नागपूर)

पारंपरिक शेतीला कौशल्याची जोड देणारा उपक्रम अभिनंदनीय आहे. यामुळे युवा शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळेल.  - राकेश दिघोरे, मूल (जि. चंद्रपूर) स्वतः मुख्यमंत्री या योजनेविषयी गंभीर आहेत. आज त्यांनी आमच्याशी साधलेला संवाद आम्हाला हिंमत देणारा आहे. गटशेतीवर अलीकडच्या काळात देण्यात येत असलेला भर या प्रशिक्षणाने अधिक दृढ होईल व शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.  - पांडुरंग नौकरकर, शेतकरी, विखणी (जि. वर्धा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com