agriculture news in marathi, CM Devendra Fadanvis visits Pani Foundation work in Avandi district Sangli | Agrowon

दुष्काळ केवळ मोठ्या धरणांमुळे संपणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

सांगली : राज्यातील दुष्काळ केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्त्वाची ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

सांगली : राज्यातील दुष्काळ केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्त्वाची ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

   जत तालुक्‍यातील बागलवाडी आणि आवंढी लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (१८) केली.   मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘आवंढी गावातील दुष्काळ हटवण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट अभिनंदनास पात्र आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आज संपूर्ण गाव जात, पात, गट-तट विसरून एकत्र आले आहे. गाव जर मैदानात उतरलं तर दुष्काळ पराजित होऊ शकतो, हे गावातील जनतेने दाखवून दिले आहे. तसेच मी आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात श्रमदान केले आहे, ते काही कामाचे नाही; पण तुमच्या बरोबर श्रमदान केल्याचा मला अभिमान आहे,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले. 

या वेळी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमवेत श्रमदान केले. ग्रामस्थ आणि महिलांशी संवादही साधला. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...