मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन अाणण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
औरंगाबाद : गत तीन वर्षांत राज्य शासनाने मराठवाड्यावर विशेष लक्ष दिले. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी मान्यता दिली. शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये परिवर्तन आणण्याचे सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू अाहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठवाडामुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये रविवारी (ता. १७) हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांनीही हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

श्री. फडणवीस म्हणाले, की स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी मोठा संघर्ष केला. या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले. आता आपल्या पिढीने आज विकासासाठी लढा उभारल्यास सरकार यासाठी सवर्तोपरी सहकार्य करेल. दमन गंगा खोऱ्यातून गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात ५० टीएमसी पाणी आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील पाण्याची समस्या दूर होईल.