मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील विकासकामांचा घेतला आढावा

CM reviews the development works in the satara district
CM reviews the development works in the satara district

सातारा : जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान-मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मंगळवारी (ता. ३) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थित होते.

यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या. 

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘उरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माण खटाव या भागातील ३१ किलोमीटर वितरण प्रणालीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देऊन कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी. जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत. जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरू करतांना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होवू शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करावा,’’’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com