Agriculture news in marathi CMV loss banana panchnama completed in Raver taluka | Agrowon

रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे केळीचे पंचनामे पूर्ण

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही) रावेर तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले आहेत.

जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही) रावेर तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले आहेत. नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रावेरात केळीची लागवड मृग बहारात अधिक असते. लागवड मे, जून, जुलै यादरम्यान केली जाते. रावेर केळी लागवडीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. यंदा लहान केळी किंवा जून, जुलैमध्ये लागवडीच्या केळी बागांमध्ये ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव झाला. यात झाड पिवळे, काळे पडले. त्याची वाढ खुंटली. झाडाचा बुंधा कुजून पूर्णतः नुकसान झाले. अशात बागा वाचविण्यासाठी किडनाशकांची फवारणी सतत घ्यावी लागली.

केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग, लोकप्रतिनिधी आदींनी रावेरात पाहणी केली. 

अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांमध्ये तब्बल ७० ते ७५ टक्के नुकसान झाले. रोगग्रस्त झाडे उपटून फेकावी लागत होती. त्यांच्या जागी नव्याने लागवड करावी लागली. मोठे नुकसान झाले. पंचनामेही प्रशासनाने सुरू केले. रावेर तालुक्यातील १०५ गावांमध्ये केळी बागांवर सीएमव्ही रोग फोफावला होता. त्यात साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे, असे पंचनाम्यानंतर समोर आले आहे.

अहवाल प्रशासनाला सादर 

केळीला एकरी सर्व मिळून ५० हजार रुपये किमान खर्च लागतो. उतिसंवर्धित रोपांची लागवड रावेरात होते. रावेरातील केऱ्हाळे, मंगरूळ, पाडळे, लोहारा, थेरोळा, अहिरवाडी, रेंभोटा, विवरे बुद्रूक, ऐनपूर, विवरे खुर्द आदी गावांमधील नुकसानीचे पंचनामे करून त्याचा संयुक्त अहवाल तयार करण्यात आला आहे. महसूल व कृषी विभागाने हा अहवाल प्रशासनाला सादर केल्याची माहिती मिळाली. 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...