Agriculture news in Marathi CNG production to be 'Kandwa': President Shete | Page 3 ||| Agrowon

‘कादवा’ करणार सीएनजी निर्मिती ः अध्यक्ष शेटे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021

केवळ साखरनिर्मिती करून कारखाने चालणे शक्य नसल्याने इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. तसेच सीएनजी प्रकल्प ही सुरू करणार असल्याची घोषणा कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

नाशिक : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवाची गाळप क्षमता दुप्पट केली असून, केवळ साखरनिर्मिती करून कारखाने चालणे शक्य नसल्याने इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. तसेच सीएनजी प्रकल्प ही सुरू करणार असल्याची घोषणा कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव यांनी केले.पुढे शेटे म्हणाले, की केंद्र सरकारने इथेनॉल सोबतच सीएनजी प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना करत काही सवलती देऊ केल्या आहेत. सीएनजी निर्मितीसाठी आवश्यक ७५ टक्के कच्चा माल उपलब्ध असून, नाशीवंत भाजीपाला तसेच हत्ती गवताचा वापर करत गॅसनिर्मिती करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, इथेनॉल सीएनजी प्रकल्पास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेटे यांनी केले.

या वेळी सभासद विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कारखान्याचे विविध प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून दिली जाईल. रस्त्यांची कामे करण्यात येतील, असे सांगितले. सभासदांनी चर्चेत भाग घेत प्रश्‍न विचारले. त्यास शेटे यांनी उत्तरे दिली. संचालक शहाजी सोमवंशी यांनी आभार मानले. या वेळी सर्व संचालक अधिकारी उपस्थित होते.

...तर निवडणूक लढणार नाही : शेटे 
कादवाला बँकेने कर्जपुरवठा बंद केला होता. तो सुरू केला हा गुन्हा आहे का? १२५० टन गाळपक्षमता २५०० क्षमतेवर गेली. बायोप्रोडक्ट नसताना उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला. महाराष्ट्रातील नावाजलेल्या कारखान्यांच्या पंगतीत कादवाचे स्थान नेले. काळाची गरज ओळखत इथेनॉल सीएनजी प्रकल्प हाती घेतले हा गुन्हा आहे का? असे सांगत बंद पडायच्या अवस्थेतील कादवा सुरू ठेवत त्यास ऊर्जितावस्था आणण्याची शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव मिळवून देत विश्‍वास सार्थ ठरवत कादवाची प्रगती होत आहे. जर सुज्ञ सभासदांनी आपल्याला सांगितले, की थांबा तर मी निवडणूकही लढवणार नाही; परंतु संस्थेच्या हितासाठी कुणीही अपप्रचार करत कादवाचे प्रगतीला खीळ घालू नये, असे शेटे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...