Agriculture news in Marathi, Co-operative societies should do other business for income generation | Agrowon

सहकारी सोसायट्यांनी उत्पन्नवाढीसाठी इतर व्यवसाय करावे : पणन संचालक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पुणे : शेतकरी कंपन्यांना कर्जपुरवठा, व्यवसाय करण्यावर मर्यादा येत आहे; त्या आधीपासून सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. हे सर्वांत मोठे काम आहे. मात्र, उत्पन्नवाढीसाठी सहकारी संस्थांनी इतर व्यवसाय करावेत, असे मत पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.

पुणे : शेतकरी कंपन्यांना कर्जपुरवठा, व्यवसाय करण्यावर मर्यादा येत आहे; त्या आधीपासून सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. हे सर्वांत मोठे काम आहे. मात्र, उत्पन्नवाढीसाठी सहकारी संस्थांनी इतर व्यवसाय करावेत, असे मत पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने लोकसंवाद मोहीम व अटल महापणन पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (ता. ५) आयोजित केला होता, त्या वेळी तोष्णीवाल बोलत होते. या वेळी पुणे ग्रामीणच्या सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक कुंभार, सहायक निबंधक सुनंदा जाधव, आर. एन. जगताप उपस्थित होते. या वेळी जाधववाडी (जुन्नर), भराडी (आंबेगाव), दोंदे (खेड), भाजे (मावळ), मुळशी (मुळशी), न्हावी (भोर), कर्नलवाडी (पुरंदर), लोणी भापकर (बारामती), कालठण (इंदापूर), पारगाव (दौंड), मांडवगण फराटा (शिरूर), थेऊर (हवेली), सविंदणे (शिरूर) येथील सोसाट्यांच्या सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या सचिवांना पुरस्काराने गौरविण्यात आले. बारामती, जुन्नर, आंबेगाव या खरेदी-विक्री संघांच्या व्यवस्थापकांना पुरस्कार देण्यात आला.

श्री. तोष्णीवाल म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांचे कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नाऐवजी इतर व्यवसायातून उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. अटल महापणनच्या माध्यमातून वेगळी वाट धरण्याची संधी मिळाली आहे. आज ग्रामीण भागात नागरिकांमध्ये बदल होत आहेत. पंच समितीचा सहभाग खूप आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात ९२ संस्थांनी व्यवसाय सुरू केले आहेत, त्यासोबतच इतरही संस्थांनी व्यवसाय हाती घावेत.’’

डॉ. कुंभार म्हणाले, ‘‘अटल महापणनच्या माध्यमातून जे काम झाले आहे, ते काम लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. म्हणून, लोकसंवाद मोहीम राबविण्यात येत आहे. कार्यकारी सोसाट्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. आता फक्त एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता लोकांना गरज असलेले व्यवसाय करावेत. काही संस्थांना संस्थेच्या सभासदांना गरज लक्षात घेऊनही व्यवसाय सुरू करता येईल. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात येईल.’’ स्वप्नील फुंदे यांनी प्रास्तविक केले.


इतर ताज्या घडामोडी
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...