Agriculture news in Marathi Co-operative society elections postponed again till March 31 | Page 3 ||| Agrowon

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ३१ मार्चपर्यंत स्थगिती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले.

कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळसह जिल्हा बॅंक, राजाराम कारखान्यासह सुमारे एक हजार संस्थांची प्रक्रिया थांबणार आहे. ज्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू आहेत, त्या टप्प्यावरच स्थगिती देण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सभा, समारंभ, आंदोलने, यात्रांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत सहकारी संस्थांच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सहकार विभागाने या निवडणुकांना स्थगिती देत असल्याचा आदेश सायंकाळी काढला.

या नव्या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा स्थगिती उठवली व पुन्हा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. ‘गोकुळ’ची प्रारूप यादी प्रसिद्ध होऊन त्यावर हरकत दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता, तर जिल्हा बॅंकेची ठराव संकलनाची प्रक्रिया मंगळवारीच संपली. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था, २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना या मुदतवाढीतून वगळले आहे. मात्र निवडणुकीबाबतचे नियम अंतिम होईपर्यंत या सोसायट्यांना निवडणूक घेता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

पाचव्यांदा मुदतवाढ
राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर याआधी मार्चच्या अखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा ३० जूनपर्यंत, दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत तर १६ जानेवारी रोजी चौथ्यांदा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु चौथी मुदतवाढ त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला मागे घेत, निवडणुका घेण्याचा नवा आदेश काढला होता.


इतर ताज्या घडामोडी
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
स्थानिक स्वराज्य संस्थांना आणखीन निधी ः...मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व...
खरिपापूर्वी कृषी विक्रेत्यांना कोरोना...नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन...
धान बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ः...भंडारा : महाविकास आघाडी शेतकरी हितासाठी बांधील...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
पांदण रस्ता मोकळा करा, अन्यथा...नागपूर : शेतापर्यंत जाणारी वाट एका शेतकऱ्याने...
जैविक उत्पादनांच्या बाजारपेठेला फटका...पुणे : राज्यातील जैविक खते व जैव उत्तेजकांच्या...
सातारा जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकरी...सातारा : जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, माण...
जालना जिल्ह्यात तेरा हजार क्‍विंटल...जालना : जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीने खरेदी...
अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे हवे ६० हजार...अकोला ः जिल्ह्यात यंदा सोयाबीन व कपाशीच्या...
वऱ्हाडात ‘पूर्वमोसमी’ची वादळी हजेरीअकोला ः वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी...
नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी...नाशिक : जिल्ह्यात विविध भागांत तुरळक पूर्वमोसमी...
सिंधुदुर्गात ८२ हजार क्विंटल भातखरेदीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात या वर्षी विक्रमी...
प्रत्यक्षात तक्रारदारच नसल्याची माहिती...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो...
रत्नागिरीत २३ हजार क्विंटल भात खरेदीरत्नागिरी ः महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह...
आटपाडी तालुक्यातील अनेक गावांत गारपीटआटपाडी, जि. सांगली : तालुक्‍यात बुधवार (ता.१४)...
‘चित्री’ प्रकल्पात पाण्याची उपलब्धता...आजरा, जि कोल्हापूर : ‘चित्री’ प्रकल्पामध्ये...
जळगाव जिल्हा बँकेचे पीककर्ज रोखीने...जळगाव ः जिल्ह्यात पीककर्ज वितरणात आघाडीवर...
केंद्रीय जैव उत्तेजके समितीची स्थापना पुणे : जैव उत्तेजके किंवा ‘पीजीपी’ (प्लांट ग्रोध...
कोकणातून हापूसच्या ३४ हजार पेट्या रवानारत्नागिरी ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून...