Agriculture news in Marathi Co-operative society elections postponed again till March 31 | Agrowon

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ३१ मार्चपर्यंत स्थगिती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले.

कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळसह जिल्हा बॅंक, राजाराम कारखान्यासह सुमारे एक हजार संस्थांची प्रक्रिया थांबणार आहे. ज्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू आहेत, त्या टप्प्यावरच स्थगिती देण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सभा, समारंभ, आंदोलने, यात्रांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत सहकारी संस्थांच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सहकार विभागाने या निवडणुकांना स्थगिती देत असल्याचा आदेश सायंकाळी काढला.

या नव्या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा स्थगिती उठवली व पुन्हा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. ‘गोकुळ’ची प्रारूप यादी प्रसिद्ध होऊन त्यावर हरकत दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता, तर जिल्हा बॅंकेची ठराव संकलनाची प्रक्रिया मंगळवारीच संपली. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था, २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना या मुदतवाढीतून वगळले आहे. मात्र निवडणुकीबाबतचे नियम अंतिम होईपर्यंत या सोसायट्यांना निवडणूक घेता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

पाचव्यांदा मुदतवाढ
राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर याआधी मार्चच्या अखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा ३० जूनपर्यंत, दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत तर १६ जानेवारी रोजी चौथ्यांदा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु चौथी मुदतवाढ त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला मागे घेत, निवडणुका घेण्याचा नवा आदेश काढला होता.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...