agriculture news in marathi, Co-operatives minister Deshmukh Inspection of Lamegawi Crops | Agrowon

सहकारमंत्र्यांकडून लांडगेवाडीच्या पिकांची पाहणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नांदेड ः शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीनची बाजारात कमी किमतीत विक्री करू नये. हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीस न्यावा. शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

नांदेड ः शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीनची बाजारात कमी किमतीत विक्री करू नये. हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीस न्यावा. शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने श्री. देशमुख यांनी गुरुवारी (ता. ११) दुपारी लांडगेवाडी (ता. लोहा) येथील मरिबा मस्के आणि किशन वलोटे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. या वेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी विश्वांभर मंगनाळे, सहायक निबंधक जी. आर. कौरवार, बाजार समितीचे सचिव आनंद घोरबांड, सरपंच कलावती रामचंद्र बलोरे, शेतकरी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘पीक कापणी प्रयोगाच्या वेळी शेतकरी, तसेच सरपंचांनी उपस्थित राहिले पाहिजे. पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याबाबतचा अहवाल सादर करावा. बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबवावी. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. पाणीटंचाई उपायोजना आराखडा तयार करून सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. श्री. देशमुख यांनी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वाढीपूर्वीच वाळून गेलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...