Agriculture news in marathi Co-ordinating Nagar market committee started | Agrowon

समन्वय साधत नगर बाजार समिती सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नगर ः प्रयत्न करुनही गर्दी कमी होत नसल्याने बाजार समितीत भाजीपाला, फळांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३०) घेतला होता. मात्र, रात्री पुन्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, महापालिकेचे अधिकारी व पोलिस प्रशासन यांच्याशी समन्वय साधत गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना करत भाजीपाला, फळांची खरेदी-विक्री सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार आज (मंगळवारी) (ता. ३१) भाजीपाला व फळांची बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात खरेदी विक्री झाली. 

नगर ः प्रयत्न करुनही गर्दी कमी होत नसल्याने बाजार समितीत भाजीपाला, फळांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३०) घेतला होता. मात्र, रात्री पुन्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, महापालिकेचे अधिकारी व पोलिस प्रशासन यांच्याशी समन्वय साधत गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना करत भाजीपाला, फळांची खरेदी-विक्री सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार आज (मंगळवारी) (ता. ३१) भाजीपाला व फळांची बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात खरेदी विक्री झाली. 

मोठे खरेदीदार आले नसल्याने शेतकऱ्यांनीच थेट छोट्या ग्राहकांना विक्री केली. सुमारे तीनशे वाहने भाजीपाला, फळे घेऊन आली होती. गर्दी  टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात होता. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्या सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय असला तरी नगर बाजार समितीत भाजीपाला, फळांचा बाजार सुरु होताच. छोट्या खरेदीदारासोबत स्थानिक नागरिक गर्दी करत असल्याचा दोन वेळा अनुभव आल्याने बाजार समिती बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

सोमवार (ता. ३०) चा अनुभवही असाच असल्याने हतबल झालेल्या जिल्हा प्रशासन, बाजार समिती प्रशासनाने बंदचा पुन्हा निर्णय घेतला. त्यामुळे फळे, भाजीपाल्याचे नुकसान होणार असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पुन्हा रात्री जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन बाजार समितीत होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करत भाजीपाला, फळांची खरेदी विक्री सुरू ठेवण्याची विनंती केली. 

प्रशासनाने विनंती मान्य करत आज (मंगळवारी) सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत भाजीपाला, फळांची खरेदी-विक्री झाली. वाहतूक परवाने असलेल्या सुमारे सव्वादोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी फळे, भाजीपाल्याची वाहने नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यातून आणली होती. 

लिलाव झाले नाहीत. मात्र, शेतकऱ्यांनी थेट छोट्या विक्रेत्यांना विक्री केली. गर्दी टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. नेप्ती बाजारात गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजना करत भाजीपाला, फळांची नियमित खरेदी - विक्री सुरु राहणार असल्याचे शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...