Agriculture news in Marathi Coarse clutter will include sustainable production, processing, export | Agrowon

मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन, प्रक्रिया, निर्यातीचा असेल समावेश

संतोष मुंढे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची शाश्वती देणारे क्लस्टर नेमके कसे असावे, याचे सादरीकरण फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी फळबाग व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्यासमोर केले. अपेक्षित शाश्वत उत्पादन, प्रक्रिया, निर्यात व क्षेत्र वृद्धीसाठी सुधारित लागवड अंतरासह प्रयोगाचा यामध्ये समावेश आहे.

औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची शाश्वती देणारे क्लस्टर नेमके कसे असावे, याचे सादरीकरण फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी फळबाग व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्यासमोर केले. अपेक्षित शाश्वत उत्पादन, प्रक्रिया, निर्यात व क्षेत्र वृद्धीसाठी सुधारित लागवड अंतरासह प्रयोगाचा यामध्ये समावेश आहे.

राज्यात उत्पादनक्षम मोसंबी बागांचे क्षेत्र जवळपास ३३ हजार हेक्टर आहे. त्यापैकी जवळपास २५ ते २७ हजार हेक्‍टर क्षेत्र मराठवाड्यात आहे. त्यातही सर्वाधिक क्षेत्र औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत आहे. विशेष करून गोदावरी नदीकाठच्या भागात मोसंबीची क्षेत्र प्राधान्याने विस्तारलेले आहे. एकीकडे विदर्भातील संत्रा या लिंबूवर्गीय फळ पिकाचे जवळपास तीन क्लस्टर निर्माण होत असताना मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोसंबी या लिंबूवर्गीय फळ पिकाचे शाश्वत उत्पादन, प्रक्रिया तसेच निर्यातीसाठी चे क्लस्टर का नसावे? असा प्रश्न पुढे आल्यानंतर मोसंबीच्या क्लस्टर विषयीची चर्चा सुरू झाली. 

त्यातच राज्याचे फळबाग व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मोसंबीचे जवळपास पंधरा कोटी रुपये खर्चाचे क्लस्टर निर्माण केले जाईल अशी घोषणा केली. या घोषणेमुळे जीआय मानांकन मिळालेल्या मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत. 

असे असेल क्लस्टरचे स्वरूप
या क्लस्टरमध्ये साधारणतः पैठण केंद्रबिंदू मानून त्याच्या आसपासच्या तीस किलोमीटर परिघात असणाऱ्या उत्पादनक्षम किमान १ हजार एकरवरील मोसंबी बागांचा यामध्ये समावेश असेल. या बागांचे सरासरी एकरी उत्पादन १० टन पकडता या  बागांमधून साधारणतः १० हजार टन मोसंबीचे उत्पादन मिळेल. या उत्पादनावर विविध भागांच्या देशांच्या गरजेनुसार प्रक्रिया करण्याचे खास युनिट पैठण परिसरात असेल. या प्रक्रियेमध्ये वॅक्सिंग, डीग्रीनिंग, जी. ए. प्रक्रिया, प्री कुलिंग, पॅकिंग आदी बाबींचा समावेश असेल. या प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवृद्धी झालेल्या मोसंबीच्या एकूण उत्पादनापैकी २०% साधारणतः दोन हजार टन मोसंबीची निर्यात केली जाईल. ४० टक्के अर्थात चार हजार टनची देशांतर्गत विविध बाजारात ब्रँडिंग करून विक्री केली जाईल. तर उर्वरित मोसंबीवर प्रक्रिया करण्याची सोय असेल.

फळबाग व रोहयो मंत्री यांना सादर केलेल्या क्लस्टरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर, लागवडीसाठी जमिनीची निवड, खात्रीची पाणी उपलब्धता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, लागवडीची सुधारित पद्धत, गरजेप्रमाणे सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापन, तांत्रिक पद्धतीने बहर नियोजन आदी बाबी मांडल्या.
- डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ज्ञ, औरंगाबाद
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...