agriculture news in marathi, Cockroach in Aurangabad 1200 to 1800 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 एप्रिल 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३) काकडीची ६० क्‍विंटल आवक झाली. तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३) काकडीची ६० क्‍विंटल आवक झाली. तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १८० क्‍विंटलची आवक झाली. तिला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४६७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २४१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवर ३३ क्‍विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये, गवारची आवक २४ क्‍विंटल, तर दर २००० ते ६०००, भेंडीची आवक ३५ क्‍विंटल, तर दर १६०० ते ३२००, वालशेंगांची आवक ३ क्‍विंटल, 
तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा राहिला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला ४००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

पत्ताकोबीची आवक २१६ क्‍विंटल, तर दर ७०० ते ९०० रुपये, फ्लाॉवरची आवक ३५ क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक २२ क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २८ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३७ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२५ क्‍विंटल आवक झालेल्या कैऱ्याचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

आठ क्‍विंटल आवक झालेल्या दिलपसंदला दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १००० ते १५०० रुपये प्रती शेकड्याचा दर मिळाला. पालकची आवक ६५०० जुड्या तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोंथिबिरीला ४०० ते १२०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वाण आवक क्‍विंटलमध्ये दर प्रतिक्‍विंटल
मोसंबी १५ २५०० ते ४५००
संत्रा ३३ २००० ते ३५००
आंबा २३ ५०००ते ८०००
द्राक्ष ३५ ३००० ते ५०००
डाळिंब १२७ ३०० ते २५००
खरबूज १३० १२०० ते १८००
टरबूज २७५ ६०० ते १२००
पपई २० ३०० ते ५००

 

इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...