Agriculture news in Marathi Coconut orchard fire at Nerur | Agrowon

नेरूर येथे नारळ बागेला आग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (ता. कुडाळ) येथील मनीषा कालिदास सावंत यांच्या मालकीच्या नारळ बागेला आग लागल्यामुळे बागेतील सुमारे ४५ झाडे आणि जलवाहिनी जळाली.

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (ता. कुडाळ) येथील मनीषा कालिदास सावंत यांच्या मालकीच्या नारळ बागेला आग लागल्यामुळे बागेतील सुमारे ४५ झाडे आणि जलवाहिनी जळाली. यामध्ये त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

कुडाळ तालुक्यातील नेरूर कर्याद नारूर येथील सौ. सावंत यांच्या बागेला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. कडक ऊन आणि गवत यामुळे आगीचा भडका उडाला. या आगीत सौ. सावंत यांच्या मालकीची उत्पादनक्षम सुमारे ४५ झाडे जळाली. तर बागेतील पाइपलाइन जळून खाक झाली आहे. आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग नजीक सुरू असलेल्या मोबाईल टॉवरचे काम करताना लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या नुकसानीसंदर्भात तहसीलदार, दूरसंचार अधिकारी यांना लेखी निवेदन सौ. सावंत यांनी दिले आहे. नुकसानीचा पंचनामा तलाठी व्ही. एस. शेणवी यांनी केला आहे.

आगीचे सत्र सुरूच
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरूच आहे. सध्या काजू, हापूस आंबा याचा हंगाम सुरू आहे. बागेत आंबे आणि काजू ही तोडणीस तयार असल्याने सद्यःस्थितीत आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अशा घटनांमुळे बाग मालकांना याचा मोठा फटका बसत असल्याने तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...