agriculture news in Marathi, code of conduct is obstacle in help of flood affected people, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची अडचण
तात्या लांडगे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019


पुरामुळे राज्यातील चार लाख २७ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले असून घरांची पडझड, जनावरे, व्यक्‍तींचा मृत्यू, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व रस्ते दुरस्तीसाठी सहा हजार ८१३ कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठविला आहे. केंद्रीय पथकाने पाहणी केली असून मदतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु, कर्जमाफीबद्दल काही माहिती नाही.
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई

सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५ जिल्ह्यांतील अतिवृष्टी, महापुराने पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने सहा हजार ८१३ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी पाठविला. तत्पूर्वी, केंद्रीय पथकाने पाहणी करूनही मदत वितरणासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण असल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी दिली. तर पूरग्रस्तांच्या दोन हेक्टरपर्यंतच्या कर्जमाफीचीही कार्यवाही सुरू नसल्याचे सांगितले.

दरम्यान, दोन हेक्‍टरपर्यंत कर्जमाफी जाहीर करूनही त्याची माहिती संकलित करण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे वरुणराजाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा संसार पुरामुळे वाहून गेला. शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरांची पडझड झाली तर पशुधन वाहून गेले. तसेच पाणीपुरवठा योजनांचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंत पीककर्ज माफीचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील चार लाख ४७ हजार शेतकरी पात्र ठरतील आणि त्यांच्यासाठी सुमारे ९४९ कोटींची गरज लागेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला. 

मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. मात्र, त्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही तर दुसरीकडे केंद्राने आता पुरामुळे नुकसान झालेल्या मदतीसाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केल्याने पूरग्रस्तांपुढे पेच निर्माण झाला आहे.

पुरामुळे नुकसान...
नुकसानग्रस्त जिल्हे : २५
पिकांचे नुकसान : ४.२६ लाख हेक्‍टर
दोन हेक्‍टरपर्यंत कर्जमाफीस पात्र शेतकरी : ४.४७ लाख
कर्जमाफीसाठी लागणारी रक्‍कम : ९४९.८९ कोटी
केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव : ६,८१३.४२ कोटी

 

इतर बातम्या
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार...सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्...
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख...बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसानसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि...
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळनाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी...
कापूस उत्पादक प्रकाश पुप्पलवार यांचा...यवतमाळ  ः इंडियन कॉटन असोसिएशन तसेच...
परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (...
उमराणे परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळनाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात...
बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...