Agriculture news in marathi, Coffee production in World increases | Page 2 ||| Agrowon

जगातील कॉफी उत्पादनात वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः जगातील कॉफी उत्पादनात दीड टक्क्याने वाढ होणार अाहे. जगातील २०१६-१७ या वर्षातील कॉफी उत्पादन १५३.९ दशलक्ष पिशव्यांवर (एक पिशवी १६० किलो) पोचेल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय काॅफी संघटनेने व्यक्त केला अाहे.

याअाधी १५१.६ दशलक्ष पिशव्या कॉफी उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला होता; मात्र इंडोनेशियातील कॉफी उत्पादन वाढणार अाहे. यामुळे जगातील कॉफी उत्पादनात वाढ होणार असल्याचे अांतरराष्ट्रीय कॉफी संघटनेने सुधारित अंदाज अहवालात नमूद केले अाहे.

नवी दिल्ली ः जगातील कॉफी उत्पादनात दीड टक्क्याने वाढ होणार अाहे. जगातील २०१६-१७ या वर्षातील कॉफी उत्पादन १५३.९ दशलक्ष पिशव्यांवर (एक पिशवी १६० किलो) पोचेल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय काॅफी संघटनेने व्यक्त केला अाहे.

याअाधी १५१.६ दशलक्ष पिशव्या कॉफी उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला होता; मात्र इंडोनेशियातील कॉफी उत्पादन वाढणार अाहे. यामुळे जगातील कॉफी उत्पादनात वाढ होणार असल्याचे अांतरराष्ट्रीय कॉफी संघटनेने सुधारित अंदाज अहवालात नमूद केले अाहे.

अरेबिका कॉफीचे उत्पादन १०.२ टक्क्यांनी वाढून ९७.३ दशलक्ष पिशव्या होईल; मात्र रोबस्टा काॅफीचे उत्पादन १०.६ टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. या काॅफीचे उत्पादन ५६.६ दशलक्ष पिशव्या होण्याचा अंदाज अाहे. ब्राझीलमध्ये २०१७-१८ या वर्षातील काॅफीचे उत्पादन घटण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर जगातील काॅफीचे दर जुलैमध्ये वाढले होते. काॅफीचे दर सरासरी ४ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती काॅफी संघटनेने दिली अाहे.

कॉफी निर्यातीत साडेपाच टक्क्यांनी वाढ
गेल्या जूनमध्ये कॉफीच्या निर्यातीत ५.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. २०१६-१७ मधील पहिल्या नऊ महिन्यातील जगातील एकूण कॉफी निर्यात ९२.३ दशलक्ष पिशव्यांवर पोचली अाहे. याअाधीच्या वर्षाच्या तुलनेत कॉफी निर्यातीत ५.६ टक्के वाढ झाली असल्याचे काॅफी संघटनेने म्हटले अाहे.

भारतातील काॅफी उत्पादनातही घट
भारतात २०१६-१७ मध्ये ३,१६,७०० मेट्रिक टन कॉफी उत्पादनाचा अंदाज भारतीय काॅफी मंडळाने व्यक्त केला अाहे. २०१५-१६ मध्य देशात ३,४८,००० मेट्रिक टन उत्पादन झाले होते. कमी पाऊस अाणि वाढत्या तापमानामुळे देशातील अपेक्षित उत्पादनात घट होणार असल्याचे कॉफी मंडळाने म्हटले अाहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनकोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...
नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने...नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने...
टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास...परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या...
हिंगोलीत १७ हजारावर शेतकऱ्यांच्या १८...हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात...
पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या...पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार...
मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने...
‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊसनगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा...
मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली,...
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात...नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव...
नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा...अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव...
हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढअमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा...
सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरीसिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने...