आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रो विशेष
गोंदियात पारा ६.८ अंशांवर
विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली आहे. यामुळे या भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली आहे. यामुळे या भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. पुढील काही दिवस विदर्भासह राज्यातील काही भागांत थंडी राहणार आहे. शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ६.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे या भागात किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. उत्तर भारतातील जवळपास सर्वंच भागात थंडी आहे. मात्र हिमालयाच्या परिसरात व पश्चिम बंगाल आणि सिक्कीम परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे पुढील दोन दिवसांनंतर या भागातील थंडी काहीशी कमी होणार आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढणार असल्याने उत्तरेकडून येत असलेले थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या आग्नेय भागात व मालदीवच्या परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरण होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरड्या असलेल्या वातावरणामुळे किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर भागांत कडाक्याची थंडी आहे.
मराठवाड्यातही थंडी असल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असल्याने किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. नगर, नाशिक, जळगाव, मालेगाव भागांत बऱ्यापैकी थंडी आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली भागांत काहीशी कमी थंडी आहे. कोकणातही थंडी असल्याने किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) १९.५ (२)
- अलिबाग १८.९ (१)
- रत्नागिरी २०.५ (३)
- डहाणू १८.३ (१)
- पुणे १५ (४)
- जळगाव १४.२ (२)
- कोल्हापूर १८.७ (३)
- महाबळेश्वर १५.४ (२)
- मालेगाव १६.२ (५)
- नाशिक १४.८ (५)
- सांगली १८.१ (४)
- सातारा १५.९ (३)
- सोलापूर १७.६ (१)
- औरंगाबाद १६.३ (४)
- बीड १८.४ (५)
- परभणी १६.४ (२)
- नांदेड १७.१ (३)
- उस्मानाबाद १७.२ (३)
- अकोला १५.१ (१)
- अमरावती १३.८(-१)
- बुलडाणा १६.८ (२)
- चंद्रपूर १३.४ (-१)
- गोंदिया ६.८ (-६)
- नागपूर १०.४ (-३)
- वर्धा १२.६ (-१)
- 1 of 673
- ››