agriculture news in Marathi cold on 6.8 degree Celsius in Gondiya Maharashtra | Page 2 ||| Agrowon

गोंदियात पारा ६.८ अंशांवर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली आहे. यामुळे या भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. 

पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली आहे. यामुळे या भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. पुढील काही दिवस विदर्भासह राज्यातील काही भागांत थंडी राहणार आहे. शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ६.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे या भागात किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. उत्तर भारतातील जवळपास सर्वंच भागात थंडी आहे. मात्र हिमालयाच्या परिसरात व पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे पुढील दोन दिवसांनंतर या भागातील थंडी काहीशी कमी होणार आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढणार असल्याने उत्तरेकडून येत असलेले थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या आग्नेय भागात व मालदीवच्या परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरण होण्याची शक्यता आहे. 

राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरड्या असलेल्या वातावरणामुळे किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर भागांत कडाक्याची थंडी आहे.

मराठवाड्यातही थंडी असल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असल्याने किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. नगर, नाशिक, जळगाव, मालेगाव भागांत बऱ्यापैकी थंडी आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली भागांत काहीशी कमी थंडी आहे. कोकणातही थंडी असल्याने किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. 

शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) १९.५ (२) 
  • अलिबाग १८.९ (१) 
  • रत्नागिरी २०.५ (३) 
  • डहाणू १८.३ (१) 
  • पुणे १५ (४) 
  • जळगाव १४.२ (२) 
  • कोल्हापूर १८.७ (३) 
  • महाबळेश्‍वर १५.४ (२) 
  • मालेगाव १६.२ (५) 
  • नाशिक १४.८ (५) 
  • सांगली १८.१ (४) 
  • सातारा १५.९ (३) 
  • सोलापूर १७.६ (१) 
  • औरंगाबाद १६.३ (४) 
  • बीड १८.४ (५) 
  • परभणी १६.४ (२) 
  • नांदेड १७.१ (३) 
  • उस्मानाबाद १७.२ (३) 
  • अकोला १५.१ (१) 
  • अमरावती १३.८(-१) 
  • बुलडाणा १६.८ (२) 
  • चंद्रपूर १३.४ (-१) 
  • गोंदिया ६.८ (-६) 
  • नागपूर १०.४ (-३) 
  • वर्धा १२.६ (-१)

इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...